Nagpur Weather Update: नागपुरात दसऱ्याला एकाच दिवशी इतके उत्सव पण पावसाच्या मनात काही वेगळंच ! हवामानखात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:16 IST2025-09-29T16:15:38+5:302025-09-29T16:16:55+5:30
Nagpur Weather Update: हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, पुढील ७ दिवसांपर्यंत मान्सून परतण्यास अनुकूल परिस्थिती नाहीच.

So many celebrations on a single day in Nagpur on Dussehra, but something else is on the mind of the rain! Meteorological Department's warning
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवरात्राच्या सुरुवातीपासूनच विदर्भात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. येत्या २ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभात सहभागी अनुयायींच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाचा कस लागणार आहे. रावण दहन आणि दुर्गा प्रतिमेच्या विसर्जनातही अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी रात्री विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यात बरसलेल्या पावसाने रविवारी शांतता बाळगली. रविवारी येलो अलर्ट असूनही नागपूरमध्ये दिवसभर ढग शांत राहिले. काही अंतराने हलक्या रिमझिम सरी आल्या.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, पुढील ७ दिवसांपर्यंत मान्सून परतण्यास अनुकूल परिस्थिती नाहीच. पश्चिम विदर्भ ते उत्तर मध्य महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे पुढील २४ तासांत दक्षिण-पश्चिमेकडे सरकत हळूहळू कमकुवत होईल.
म्हणून मान्सूनास विलंब
बंगालच्या उपसागर आणि अरब सागरात एकाचवेळी १ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे मध्य भारतात मान्सून ढग पुन्हा सक्रिय होतील. सध्या मान्सून परतण्याचे कोणतेही संकेत नाहीत. सध्या भरूच, उज्जैन, झाशी, शाहजहांपूरपर्यंत मान्सूनचे ढग पोहोचले आहेत.