शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएल नकोच!

By admin | Updated: May 10, 2015 02:20 IST

नागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल नागरिकांची लूट करीत असून ही फ्रेन्चार्इंजी नकोच.

नागपूर : नागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल नागरिकांची लूट करीत असून ही फ्रेन्चार्इंजी नकोच. ती रद्द करून शहरातील वीज वितरणाचा कारभार पुन्हा महावितरणकडे सोपविण्यात यावा, अशी एकमुखी मागणी शहरातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. यासंबंधात सत्यशोधक समितीकडे आमदार, नगरसेवक, संघटनांचे पदाधिकारी आणि व्यक्तिगतरीत्या लोकांनी लिखित तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत तब्बल ९ हजार ७०० तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या वीजचोरीशी संबंधित आहेत. तसेच चुकीचे मीटर रिडिंग करणे, अवास्तव विजेचे बिल आणि एसएनडीएलचे कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याच्या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत. एसएनडीएलबाबत लोकांच्या वाढत्या तक्रारींच्या संदर्भात आर.बी. गोयनका आणि गौरी चांद्रायण यांची सत्यशोधक समिती स्थापन करण्यात आली आहे. रविभवन येथील कॉटेज क्रमांक २० मध्ये समितीने आपले कार्यालय उघडले असून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात आहेत. शनिवारी दुपारी महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनीसुद्धा एसएनडीएलच्या विरोधात सामान्य नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात समितीचे अध्यक्ष गोयनका आणि चांद्रायण यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान महापौर दटके यांनी सांगितले की, एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांचा व्यवहार अतिशय वाईट आहे. नागरिकांना त्रस्त केले जात आहे. दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, एसएनडीएल नागरिकांच्या तक्रारीच ऐकून घेत नाही. त्यांच्याकडे प्रशिक्षित टेक्निशियन नाही. किती वीज दिली जात आहे आणि किती रुपये वसूल केले जात आहे, याची माहिती देणारी व्यवस्थाच नाही. आ. विकास कुंभारे यांनी एसएनडील आल्यापासून नागरिक त्रस्त झाले असल्याचा आरोप करीत एसएनडीएल बरखास्त करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनीसुद्धा शनिवारी सत्यशोधक समितीची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच लिखित तक्रारीचे निवेदन सादर केले. यात त्यांनी महाल झोन एसएनडीएलकडून काढून महावितरणकडे सोपविण्याची मागणी केली. यासोबतच एसएनडीएल आल्यापासून विजेच्या बिलात भरमसाट वाढ झाली आहे. अवास्तव विजेचे बिल पाठविले जात आहे. तसेच कंपनीने आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. तसेच ग्राहकांवर वीजचोरीचे व अन्य गुन्ह्यांची नोद करून त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जात आहे. ही रक्कम एसएनडीएलकडून वसूल करून शासनाकडे जमा करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासोबत कैलास चुटे, रमेश सिंगारे, डॉ. रवींद्र भोयर, नीता ठाकरे, स्वाती आखतकर, रिता मुळे, दिव्या धुरडे, विजय आसोले, संजय ठाकरे, अनिल लांबाडे, परशु ठाकूर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)