सत्संगादरम्यान १.६५ लाखांच्या मंगळसूत्रांचे ‘स्नॅचिंग’

By योगेश पांडे | Published: August 3, 2023 12:18 PM2023-08-03T12:18:42+5:302023-08-03T12:19:34+5:30

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

'Snatching' of 1.65 lakh mangalsutras during satsang | सत्संगादरम्यान १.६५ लाखांच्या मंगळसूत्रांचे ‘स्नॅचिंग’

सत्संगादरम्यान १.६५ लाखांच्या मंगळसूत्रांचे ‘स्नॅचिंग’

googlenewsNext

नागपूर : कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सत्संगाच्या एका कार्यक्रमादरम्यान चोरटे सक्रिय झाले व तीन महिलांच्या गळ्यातील १.६५ लाख किंमतीची मंगळसूत्रे लंपास केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अपर्णा चरण मिलमिले (५८, स्मृतीनगर, बोकारा रोड, कोराडी) या १ ऑगस्ट रोजी भट सभागृहात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सत्संग कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कार्यक्रम संपल्यावर महाप्रसाद होता. महाप्रसादासाठी गर्दी होती व त्याचाच फायदा उचलून अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले.

मिलमिले यांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीमुळे ते शक्य होऊ शकले नाही. कार्यक्रमाला आलेल्या इतर दोन महिनांचे मंगळसूत्रदेखील चोरी गेल्याची माहिती मिळाली. मिलमिले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: 'Snatching' of 1.65 lakh mangalsutras during satsang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.