शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीने केले रस्त्यांचे वॉकिंग ‍ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, आय.टी.डी.पी., स्मार्ट सिटीज मिशन स्वच्छ भारत आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, आय.टी.डी.पी., स्मार्ट सिटीज मिशन स्वच्छ भारत आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या वतीने आयोजित स्ट्रीट फार पीपल चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडतर्फे शहरातील विविध बाजारपेठा, रस्त्यावर वॉकिंग ‍ऑडिट करण्यात आले.

स्ट्रीट फार पीपल चॅलेंज आर्किटेक्ट, शहरी नियोजन आणि अन्य क्षेत्राच्या विद्यार्थ्यांसाठी व व्यावसायिकांसाठी मोठी संधी आहे. याच्या माध्यमाने ते आपल्या स्वत:ची डिझाईन आणि संकल्पनेचा विचार करून नागरिकांसाठी सुविधाजनक रस्ते तयार करू शकतात. पायी चालणाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणे, हा याचा उद्देश आहे. या उपक्रमाला नागरिकांचे सहकार्य मिळाले. पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर यांच्या नेतृत्वात व स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात स्ट्रीट फार पीपल चॅलेंज स्पर्धा आय.डी.टी.पी.च्या माध्यमाने ऑनलाईन आयोजित करण्यात आली. स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांतील ५० चमूंनी भाग घेतला होता. यात आर्किटेक्ट, शहरी नियोजन आणि आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी यांचा समावेश होता.

या वॉकिंग ‍ऑडिटमध्ये ‘फ्लॅगशिप इंटरव्हेन्शनसाठी" सीताबर्डी आणि महाल रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच "नेबरहूड इंटरव्हेनशन" साठी ट्रॅफिक पार्क आणि सक्करदरा तलावाच्या समोरचा भाग निवडला आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे त्यांनी कोणत्याही एका साईटची निवड करून त्यासाठी डिझाईन तयार करायची आहे. स्मार्ट सिटीच्या चमूंनी वॉकिंग ‍ऑडिट करून त्यातील समस्या, सामर्थ्य आणि भागधारकांच्या अपेक्षेबद्दल आपले मत दिले आहे. वॉकिंग ‍ऑडिटची सुरुवात उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. प्रणिता उमरेडकर, महाव्यवस्थापक पर्यावरण, राहुल पांडे, मुख्य नियोजक, अमित शिरपुरकर, पराग अर्मल, हर्षल बोपर्डीकर, स्मृती सावणे, प्राची पानसरे आणि सुप्रिया बचाले यांनी यात सहभाग घेतला. आर्किटेक्ट, स्थानिक दुकानदार, संभाव्य खरेदीदार इत्यादींनी आपले मत नोंदविले.