शासकीय दंत रुग्णालयात 'सिम्युलेटर' घोटाळा ! किंमत दीड कोटी, खरेदी चार कोटींहून अधिक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:23 IST2026-02-10T14:21:23+5:302026-02-10T14:23:01+5:30

Nagpur : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (जीडीसीएच) कोट्यवधी रुपयांचा कथित गैरव्यवहार उघडकीस येण्याची चिन्हे दिसत आहेत.

'Simulator' scam in government dental hospital! Price one and a half crores, purchase more than four crores? | शासकीय दंत रुग्णालयात 'सिम्युलेटर' घोटाळा ! किंमत दीड कोटी, खरेदी चार कोटींहून अधिक ?

'Simulator' scam in government dental hospital! Price one and a half crores, purchase more than four crores?

सुमेध वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (जीडीसीएच) कोट्यवधी रुपयांचा कथित गैरव्यवहार उघडकीस येण्याची चिन्हे दिसत आहेत. शिकाऊ क्लिनिकल' प्रशिक्षणासाठी तब्बल ४ कोटी ३२ लाख रुपये खर्चुन खरेदी करण्यात आलेली सुरु 'डेंटल सिम्युलेटर' यंत्रे होण्यापूर्वीच नादुरुस्त ठरली असून मागील नऊ महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. बाजारभावाच्या तुलनेत ही यंत्रे अनेक पटीने महाग घेतल्याची चर्चा आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंजुरीनंतर एका रशियन कंपनीकडून तीन सिम्युलेटर खरेदी करण्यात आले. दंतशल्य, कृत्रिम दंत आणि मुखशल्य या विभागांसाठी उपलब्ध झालेल्या या यंत्रांचे ३१ मे २०२५ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

किंमत दीड कोटी, खरेदी चार कोटींहून अधिक ?

सूत्रांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या सिम्युलेटरची अपेक्षित किंमत जास्तीत जास्त दीड कोटी रुपयांपर्यंत असते. तरीही ४.३२ कोटी रुपये मोजण्यात आले, यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता होती का, असा संशय व्यक्त केला जात आहे. टेंडर प्रक्रिया, तांत्रिक पडताळणी, किंमत तुलना हे सर्व नियम पाळले गेले होते का? की घाईघाईत निर्णय घेऊन सरकारी तिजोरीला फटका बसला? याची तपासणी होणे गरजेचे आहे.

र्टीची यंत्रे यांपासून द्यकीय विभाग कशी बर का?

सिम्युलेटर सुरू करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने संबंधित कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. कंपनीचे इंजिनिअर येऊन गेल्यानंतर काही नवीन पार्ट्स बसवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आणि ते रशियातून मागवण्यातही आले. परंतु आता प्रश्न असा की खरेदीपूर्वी यंत्रांची पूर्ण तपासणी झाली नव्हती का? कार्यक्षमतेची खात्री न करता एवढा मोठा व्यवहार कसा मंजूर झाला? यंत्र खरेदीत नेमके कोण सहभागी होते, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मात्र चाचणीदरम्यान दंतशल्य व कृत्रिम दंत विभाग प्रमुखांनी यंत्र उपयोगी नसल्याचे स्पष्ट केले, तर मुखशल्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पंदिलवार यांनी ते सुरू असल्याचे नमूद केले.

प्रत्यक्षात हे यंत्र इंजेक्शन देण्यापुरतेच मर्यादित असल्याचे आता समोर येत आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण प्रत्यक्षात त्याचा उपयोग शून्य असल्याचे चित्र समोर येत आहे.

यंत्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू

"तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या कार्यकाळात या सिम्युलेटरची खरेदी झाली. हे यंत्र सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे."
- डॉ. मंगेश फडनाईक, अधिष्ठाता शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title : सरकारी दंत अस्पताल में घोटाला: सिमुलेटर की लागत बढ़ी?

Web Summary : एक सरकारी डेंटल कॉलेज में संभावित घोटाला सामने आया है। ₹4.32 करोड़ में खरीदे गए डेंटल सिमुलेटर खराब और अप्रयुक्त हैं। बाजार मूल्य की तुलना में पारदर्शिता और बढ़ी हुई लागत के बारे में सवाल उठते हैं। जांच की मांग की गई है।

Web Title : Scam in Government Dental Hospital: Simulator Cost Exceeded?

Web Summary : A possible scam in a government dental college has emerged. Dental simulators bought for ₹4.32 crore are faulty and unused. Questions arise about transparency and inflated costs compared to the market price. An inquiry has been demanded.