शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सराफांचे व्यापाऱ्यांचे बंद आंदोलन मागे

By admin | Updated: August 17, 2014 00:43 IST

चोरट्याकडून सोने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या चार सराफा व्यापाऱ्यांना शनिवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी बी.वाय. बोरकर यांनी जामीन मंजूर केला. पालकमंत्री नितीन राऊत आणि

चारही व्यापाऱ्यांना जामीन : गृहमंत्र्यांशी लवकरच चर्चानागपूर : चोरट्याकडून सोने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या चार सराफा व्यापाऱ्यांना शनिवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी बी.वाय. बोरकर यांनी जामीन मंजूर केला. पालकमंत्री नितीन राऊत आणि सहआयुक्त अनुप कुमार यांच्याशी इतवारी सराफा बाजारात सायंकाळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन मागे घेतले आणि दुकाने उघडली.चार दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. व्यापाऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी रिमांडची मागणी अमान्य केली. चार जणांवर पोलिसांनी नोंदविलेल्या सातही केसेसमध्ये प्रत्येकी १५ हजार रुपयांचा पीआर ब्रॉण्ड आणि १५०० रुपयांच्या कॅश सिक्युरिटीवर न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला. या प्रकरणी ३० आॅगस्टला नियमित सुनावणी होणार आहे. याआधी न्यायालयाने चारही जणांना शनिवारपर्यंत पीसीआर दिला होता. अनुप उदापुरे (अशोक उदापुरे ज्वेलर्स, कॉटन मार्केट), मनीष पारेख (जे.डी. ज्वेलर्स, जुनी मंगळवारी), पुरुषोत्तम हेडावू (पुरुषोत्तम ज्वेलर्स, जुनी मंगळवारी) आणि अशोक मांजरे (अशोक मांजरे ज्वेलर्स) अशी जामीन मिळालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी चौकशी न करता चोरट्याच्या म्हणण्यावरून व्यापाऱ्यांच्या अटकेची कारवाई केल्याचा आरोप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. अशा प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांच्या दक्षता समितीचा हस्तक्षेप राहील. पोलिसांच्या बळबजरीच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी न्यायालयात व्यापाऱ्यांची बाजू अ‍ॅड. प्रदीप सोनटक्के यांनी मांडली. त्यांना अ‍ॅड. मनोज कुल्लरवार आणि अ‍ॅड. आकाश जयस्वाल यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)