शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोमिनपुऱ्यात दुकानदार वसुलताहेत पार्किंग स्थळाचे भाडे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST

नागपूर : मोमिनपुरा मार्केटच्या मोहम्मद अली सराय रोडवर वाहतुकीची गंभीर समस्या आहे. अतिक्रमणाने येथील रस्ते अरूंद झाले आहेत. सरायच्या ...

नागपूर : मोमिनपुरा मार्केटच्या मोहम्मद अली सराय रोडवर वाहतुकीची गंभीर समस्या आहे. अतिक्रमणाने येथील रस्ते अरूंद झाले आहेत. सरायच्या मुख्य दारापासून रस्त्यापर्यंत २० फूट लांब जागेवर पार्किंगची घोषणा करण्यात आली आहे. रूंदीच्या हिशोबाने पार्किंग मोठी आहे, पण या पार्किंग स्थळाचे दुकानदार भाडे वसूल करीत आहेत.

सरायच्या होस्टेलपासून बब्बन हॉटेलपर्यंत रूंद परिसरात पार्किंग झोन बनविता येऊ शकतो. याकरिता खुद्द मो. अली सराय गेल्या अनेक वर्षांपाासून प्रशासनाकडे मागणी करीत आहे. पण प्रशासन यावर गंभीर नाही. सरायच्या पार्किंग स्थळावर स्थानीय दुकानदारांनी कब्जा केला आहे. स्थानीय दुकानदार आपल्या दुकानासमोरील या पार्किंग जागेवर असलेले हातठेले, चहाटपरी आणि अन्य दुकानदारांकडून दररोज भाडे वसूल करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मो. अली सरायच्या मंजूर नकाशात मुख्य प्रवेशदारापासून २० फूट लांब पार्किंगसाठी जागा सोडली आहे. ही जागा होस्टेलपासून बब्बन हॉटेलपर्यंत विस्तृत आहे. या प्रकारे बब्बन हॉटेल ते मेयो रूग्णालयाच्या सुरक्षा भिंतीपर्यंत १० फूट परिसरात पार्किंग घोषित केली आहे. स्थानिक दुकानदार पार्किंग जागेवर जास्त भाडे वसूल करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सराय अनुसार दुकानदारांचे मासिक भाडे ३ हजार रुपये आहे. तर हेच दुकानदार पार्किंगच्या जागेवर दुकान लावणाऱ्यांकडून दररोज ३०० ते ५०० रुपये वसूल करतात. या दोन्ही पार्किंग स्थळावर स्थानिक दुकानदारांचा कब्जा आहे. तर मेयो रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीकडे कबाड विक्रेत्यांचा ताबा आहे. प्रशासनाने दोन्ही जागेला पार्किंग झोन घोषित केले तर मोमिनपुरा मार्केटमध्ये पार्किंगची समस्या सुटेल आणि अतिक्रमणावर आळा बसेल व वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. मोमिनपुरा भागातील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी ही नेहमीची बाब आहे. त्यामुळे अनेकदा वाद होतात.

पार्किंग झोन व्हावा

मोहम्मद अली सरायच्या मंजूर नकाशात मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंत पार्किंग घोषित केले आहे. या जागेवर दुकानदारांचा कब्जा आहे. या जागेला पार्किंग झोन घोषित करण्याची मागणी वाहतूक विभागाकडे अनेकदा निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या जागेवर वाहन उभे करता येईल. पण विभाग कानाडोळा करीत आहे.

- हाजी मो. कलाम, सचिव सीटीसी (मो. अली सराय).