नागपुरात साडेसहा लाखांचा मास्कचा साठा जप्त ,  दुकानदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:35 PM2020-04-04T23:35:12+5:302020-04-04T23:35:55+5:30

शहरामध्ये कोरोनासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही सुमार साडेसहा लाख रुपये किमतीचा मास्कचा साठा दडवून ठेवणाऱ्या दुकानदाराला शनिवारी मुद्देमालासह अटक करण्यात आली.

Shopkeeper seizes lakhs of masks in Nagpur, shopkeeper arrested | नागपुरात साडेसहा लाखांचा मास्कचा साठा जप्त ,  दुकानदाराला अटक

नागपुरात साडेसहा लाखांचा मास्कचा साठा जप्त ,  दुकानदाराला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरामध्ये कोरोनासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही सुमार साडेसहा लाख रुपये किमतीचा मास्कचा साठा दडवून ठेवणाऱ्या दुकानदाराला शनिवारी मुद्देमालासह अटक करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नागपूर शहराचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम (युनिट क्र. ४) यांनी ही कारवाई केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा रेस्टॉरंट मागील शॉप नं. ११, जीवनधारा नं. १, भिवसरिया इंडस्ट्रीज या दुकानात मास्कचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक के. व्ही. चौगले यांच्यासह त्यांचे पथक तसेच अन्न नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी रोहिणी पाठराबे, अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप, अन्न निरीक्षक नीरज लोहकरे, शरद मोरे, अमरदीप मेश्राम व पंचांसह धाड घातली असता तिथे ६ लाख ४५ हजार १२५ रुपये किमतीचे १४,२२५ नग मास्क -३ प्लाय साठा करून ठेवल्याचे दिसले. हा माल जप्त करून दुकान मालक नवल अग्रवाल (५५) १०२, शांतिभुज अपार्टमेंट, शांतिनगर याला ताब्यात घेऊन भादंविच्या कलम १८८, २७०, सहकलम जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७. राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम ५१(ब), साथ रोग अधिनियम कलम ३, वैध मापन शास्त्र कायदा कलम १८(९), सह-वैध मापन शास्त्र (अवेष्टित वस्तू) ६(१) अन्वये कारवाई करून लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

भरारी पथकांची निर्मिती
या घटनेनंतर पोलिसांनी भरारी पथक तयार केले आहेत. झोन ४ हद्दीतील सर्व मेडिकल स्टोअर्स दुकानांना भेट देऊन मास्क आणि सॅनिटाझरची शासनमान्य दरातच साठवणूक आणि विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विक्रेते जीवनावश्यक वस्तूंची अधिक दराने विक्री करताना आढळल्यास किंवा तशा तक्रारी आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

औषध मार्केटमध्ये दोन दुकानांवर कारवाई
 गुन्हे शाखेचे युनिट - ३ व एफडीएच्या वैधमापन विभागाने गांधीबाग होलसेल औषध मार्केटमध्ये संयुक्तपणे कारवाई केली. मेसर्स लक्ष्मी एजन्सी मध्ये तपासणी केल्यावर तेथील सॅनिटायझर प्रमाणित नसल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एम. चांडक अ‍ॅण्ड कंपनीचे मास्क नियमानुसार प्रमाणित नव्हते. त्यामुळे वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ व २०११ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Shopkeeper seizes lakhs of masks in Nagpur, shopkeeper arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.