शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

धक्कादायक २०२१! नागपुरात दर महिन्याला १८ महिलांवर होतो अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 21:07 IST

Nagpur News २०१९ व २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला अत्याचारांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब आहे.

ठळक मुद्देविनयभंग, अपहरणाची संख्यादेखील वाढली

नागपूर : मागील काही कालावधीत महिला अत्याचाराचा मुद्दा परत ऐरणीवर आला असताना नागपुरातील महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये या वर्षी वाढ दिसून आली आहे. २०१९ व २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला अत्याचारांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत दर महिन्याला शहरात ११० गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या १८ इतकी आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत महिलांसंदर्भातील किती गुन्ह्यांची नोंद झाली, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, महिला अत्याचारांचे २०१९ मध्ये १३६ (दर महिन्याला ११) तर २०२० मध्ये १७२ (दर महिन्याला १४) गुन्हे नोंदविले गेले. २०२१ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत १४९ गुन्हे (दर महिन्याला १८) नोंदविण्यात आले. महिला अत्याचाराप्रमाणेच विनयभंग व अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्यादेखील वाढली आहे. विनयभंगाचे २०१९ व २०२० मध्ये अनुक्रमे ३३९ व ३२३ गुन्हे (दर महिन्याला २८ व १६) नोंदविले गेले होते. २०२१ मध्ये या दरात वाढ झाली व आठच महिन्यांत २२९ गुन्ह्यांची (दर महिन्याला २९) नोंद झाली.वर्षभरात अपहरण कसे वाढले?२०१९ मध्ये शहरात महिला अपहरणाचे ४०४ गुन्हे दाखल झाले होते. २०२० मध्ये ही संख्या २४६ वर गेली. २०२१ च्या पहिल्या आठ महिन्यांतच महिला अपहरणाची संख्या वाढली. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत २३९ महिला अपहरणांची नोंद झाली.

एकूण गुन्ह्यांत १५ टक्क्यांनी वाढ२०१९ साली महिलांसंदर्भातील १,२५२ गुन्हे (दर महिन्याला १०४) दाखल झाले होते. २०२० मध्ये हा आकडा १,१५२ वर (दर महिन्याला ९६) गेला. मात्र २०२१ मध्ये आठ महिन्यांतच ८८५ गुन्हे नोंदविल्या गेले. दर महिन्याला सरासरी ११० गुन्हे दाखल झाले व महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ दिसून आली.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी