शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना हिंदुत्वादी नव्हे तर ढोंगी ‘सेक्युलर’ पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. आता बाळासाहेब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून आता तो ढोंगी ‘सेक्युलर’ पक्ष झाला आहे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

जर शिवसेना हा ‘सेक्युलर’ पक्ष असता तर काहीच हरकत नव्हती. मात्र त्यांच्या ‘सेक्युलर’वादामध्ये ढोंगीपणा आहे. भाजपाने मुस्लिमांचे मत मिळावे यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण केले नाही. ‘सबका साथ-सबका विकास’मध्ये मुस्लिमदेखील येतात. मात्र शिवसेना कुठे ना कुठे मुस्लिमांच्या मतांसाठी व्होटबँकेचे राजकारण करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात विधान परिषदेच्या निवडणूकांत भाजपला चांगले यश मिळेल. प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते व आम्हाला विश्वास आहे की या परीक्षेत आम्ही पास होऊ. विधान परिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसते. काही ना काही परिणाम नक्कीच होत असतो व तो आपल्याला पहायला मिळेल, असे वक्तव्यदेखील त्यांनी केले.

पदवीधर मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये बराच घोळ दिसतो आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे गायब आहेत. एकाच घरातील दोघांचे नाव आहे व दोघांचे नाही. निवडणूक आयोगाला या प्रणालीत सुधारणा करावी लागेल. अर्ज भरल्यानंतर संबंधित व्यक्तीची चाचपणी झाल्यानंतर नाव आलेच पाहिजे. ती जबाबदारी आयोगाने घेतलीच पाहिजे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.