Shirish Dev gets Savarkar Gaurav award | शिरीष देव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार

शिरीष देव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे देणाऱ्या येणारा स्वा. सावरकर गौरव पुरस्कार यंदा भारतीय वायुसेनेचे माजी उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात होणार आहे. सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Shirish Dev gets Savarkar Gaurav award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.