शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रामदासपेठ भागातील भोजनालयाचे शेड तोडले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने मंगळवारी रामदासपेठ भागातील भोजनालयाचे शेड तोडले. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सेंटर पॉईंट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने मंगळवारी रामदासपेठ भागातील भोजनालयाचे शेड तोडले. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सेंटर पॉईंट हॉटेल समोरील गणेश भोजनालय, हरिओम भोजनालय, शंकर भोजनालयाचे शेड तोडले.

त्यानंतर खामला चौक ते छत्रपती चौक, वर्धा रोड, सोमलवाडा फूटपाथवरील २८ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. मंगळवारी शहरातील विविध झोनने केलेल्या कारवाईत २६२ अतिक्रमणांचा सफाया केला. पाच ट्रक साहित्य जप्त करून २० हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

धरमपेठ झोनमध्ये रामदासपेठ येथील फूटपाथवरील दोन ठेले जप्त केले. सीताबर्डी मेन रोडवरील कापड विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. झाशी राणी चौक परिसरातील नर्सरी विक्रेत्यांना हटविण्यात आले.

बोले पेट्रोल पंप ते लॉ कॉलेज चौक, रविनगर चौक, विद्यापीठ कॅम्पस दरम्यानच्या फूटपाथवरील भंगार विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. ११ शेड तोडून ३१ अतिक्रमण काढून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. पथकाने १४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.

हनुमाननगर झोनच्या पथकाने तुकडोजी पुतळा चौक ते क्रीडा चौक, रेशीमबाग चौक, सक्करदरा चौक, छोटा ताजबागपर्यंत तसेच तुकडोजी पुतळा ते न्यू सुभेदार, म्हाळगीनगर चौकापर्यंतचे ५७ अतिक्रमण हटविण्यात आले. एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील दहीबाजार पूल ते मारवाडी चौक, नेहरू पुतळा, मस्कासाथ चौक, तबला मार्केट, भारतमाता चौक, गोळीबार चौक, जुना मोटर स्टॅन्ड चौक, जुना भंडारा रोडपर्यंत ७० अतिक्रमण हटविले. एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. आसीनगर झोनच्या पथकाने राणी दुर्गावती चौक ते जयभीम चौक, महेंद्रनगर पर्यंतच्या फूटपाथवरील ३० अतिक्रमण काढले.

...

फूटपाथ विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम

सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थांचे ठेले, फळ विक्रेत्यांची गर्दी असते. यामुळे रहदारीला बाधा निर्माण होत असल्याने झोन कार्यालयांनी कारवाईसाठी स्वतंत्र पथक गठित केले आहे. आठवड्यात दोन दिवस दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत अतिक्रमण कारवाई करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना देण्यात आले आहे. मनपा मुख्यालयातील पथकही आठवड्यातून दोन दिवस अशी कारवाई करणार आहे. या पथकासोबत अन्न व औषधी प्रशासन विभागाचे पथक संयुक्त कारवाई करणार आहे.

-