ती आधी प्रेमात पडली, शरीरसंबंध ठेवले, बिनसल्यानंतर बलात्काराची तक्रार केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:14 IST2026-02-26T15:10:17+5:302026-02-26T15:14:16+5:30
Nagpur : सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर बलात्काराची तक्रार करण्याचे प्रकार वाढले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अशाच एका प्रकरणामध्ये महाविद्यालयीन तरुणी समवयीन मुलाच्या प्रेमात पडली होती.

She first fell in love, had sex, and then filed a rape complaint.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर बलात्काराची तक्रार करण्याचे प्रकार वाढले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अशाच एका प्रकरणामध्ये महाविद्यालयीन तरुणी समवयीन मुलाच्या प्रेमात पडली होती. दरम्यान, तिने स्वमर्जीने शरीरसंबंध ठेवले आणि बिनसल्यानंतर बलात्काराची तक्रार केली. त्याविरोधात प्रियकराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतल्यामुळे तो या गंभीर गुन्ह्यातून बचावला.
गणेश व्हाडगिरे, असे प्रियकराचे नाव असून तो महागाव येथील रहिवासी आहे. घटनेच्यावेळी तो विद्युत मंडळात कर्मचारी होता. त्याची प्रेयसी मेनका (काल्पनिक नाव) वर्धा येथे शिक्षण घेत होती. २०१७ मध्ये त्यांची समाजमाध्यमाद्वारे ओळख झाली.
त्यानंतर ते समाजमाध्यमावर नियमित चॅटिंग करायला लागले आणि काळाच्या ओघात त्यांची ओळख प्रेमात परिवर्तित झाली. दरम्यान, दोघांनीही लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. तसेच, विश्वासाच्या भावनेतून वारंवार सहमतीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर मेनका लग्न करण्यासाठी दबाव टाकायला लागली असता गणेशने वैयक्तिक कारणांमुळे लग्न करण्यास नकार दिला.
फसविल्याचे पुरावे मिळाले नाही
गणेशने सुरुवातीलाच लग्नाचे वचन देऊन मेनकाला प्रेमाच्या जाळ्यात फसविल्याचे पुरावे न्यायालयाला आढळून आले नाहीत. उलट मेनका वयाने सज्ञान असल्याचे आणि तिने सहमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने गणेश दोषी नसल्याचे जाहीर केले. प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यापुढे सुनावणी झाली.
परिणामी, मेनकाने २०२० मध्ये दत्तपूर पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी गणेशविरोधात एफआयआर नोंदवला आणि प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटलाही दाखल केला. करिता, गणेशने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा एफआयआर व खटला रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ती याचिका मंजूर केली.