शालार्थ आयडी घोटाळा ! काटोलकरांनी सह्या केलेली वेतन देयके केली जप्त; पोलिसांकडे तक्रारीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:35 IST2025-12-25T14:29:57+5:302025-12-25T14:35:19+5:30

Nagpur : यवतमाळ जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने वर्धा येथून अटक करून २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे.

Shalarth ID scam! Salary slips signed by Katolkar seized; Police complaints increase | शालार्थ आयडी घोटाळा ! काटोलकरांनी सह्या केलेली वेतन देयके केली जप्त; पोलिसांकडे तक्रारीत वाढ

Shalarth ID scam! Salary slips signed by Katolkar seized; Police complaints increase

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
यवतमाळ जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने वर्धा येथून अटक करून २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे. पोलिसांनी बुधवारी त्यांच्या कार्यकिर्दीत करण्यात येणाऱ्या कामाची तपासणी करताना वेतन अधीक्षक वेतन व भविष्य निधी कार्यालयातून काटोलकरांनी ज्या वेतन देयकावर सह्या केल्या ती देयके जप्त केली आहे. याशिवाय पोलिसांना शिक्षक व शिक्षक संघटनांकडूनही काटोलकर यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त होत आहे.

काटोलकर हे जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी असताना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे माहिती असूनसुद्धा त्यांचे वेतन संबंधाने शाळेकडून प्रस्तावाची शहानिशा न करता त्यांचे नियमित वेतन तसेच थकीत वेतन काढले. त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची अंदाजे १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीसंदर्भात सखोल चौकशीची मागणी शिक्षक संघटनांकडून केली आहे. सर्वश्री महाविद्यालयातील एका शिक्षिकेला बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शालार्थ आयडी मंजूर केला असल्याचीही तक्रार सदर पोलिसांत करण्यात आली होती.

जवळच्या संस्थाचालकांवर पोलिसांची नजर

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काटोलकर वर्धा, भंडारा, नागपुरात शिक्षणाधिकारी व नागपूर शिक्षण मंडळात सहसचिव असताना त्यांच्या जवळीक असलेल्या शिक्षण संचालकांवरही पोलिसांनी नजर आहे. काटोलकर यांचे इतर साथीदारांचा शोध पोलिस पथकामार्फत सुरू आहे. काटोलकरांनी ज्या शाळांच्या शिक्षकांच्या प्रस्तावाची शहानिशा न करता नियमित व थकीत वेतन काढून दिले. त्या शाळांचे संस्थाचालक पोलिसांच्या टार्गेटवर आहे. पोलिस त्या दृष्टिकोनातून तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे तक्रार करूनही त्यांनी संबंधित शिक्षिकेला शालार्थ आयडी मंजूर केला होता, अशी शिक्षकाची तक्रार आहे. त्यांच्या पत्नीच्या नियुक्ती संदर्भातील तक्रारीही करण्यात आल्या आहे. ते भंडारा जिल्ह्यात शिक्षणाधिकारी असताना त्यांनी याच प्रकारचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याचाही तपास पोलिस करीत आहे.
 

Web Title : शलार्थ आईडी घोटाला: काटोलकर के वेतन दस्तावेज जब्त, शिकायतें बढ़ीं

Web Summary : रवींद्र काटोलकर शलार्थ आईडी घोटाले में गिरफ्तार। उनके हस्ताक्षर वाले वेतन दस्तावेज जब्त। उन पर धन के दुरुपयोग, धोखाधड़ी वाले आईडी जारी करने और 12 करोड़ रुपये से अधिक का वित्तीय नुकसान पहुंचाने का आरोप है। पुलिस आगे जांच कर रही है।

Web Title : Shalarth ID Scam: Katolkar's Salary Documents Seized, Complaints Increase

Web Summary : Ravindra Katolkar arrested in Shalarth ID scam. Salary documents signed by him seized. He's accused of misappropriating funds, issuing fraudulent IDs, causing a financial loss of over ₹12 crore. Police investigate further accomplices and institutions involved.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.