नागपुरच्या “हॉटेल यशराज इन”मध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड ! गरजू मुलींना पटकन श्रीमंत होण्याची दाखवली स्वप्ने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:36 IST2025-11-15T19:24:47+5:302025-11-15T19:36:34+5:30
Nagpur : पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. कस्टमर बनलेला पोलिस-सहाय्यक हॉटेलमध्ये पाठवण्यात आला आणि त्याने वेळ साधून इशारा दिल्यावर बाहेरून पोलिसांनी छापा टाकला.

Sex racket busted in Nagpur's "Hotel Yash Raj Inn"! Needy girls were shown dreams of getting rich quickly
नागपुर : नागपुरमधील उमरेड रोडजवळील हॉटेल यशराज इनमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढे तपासासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यामध्ये सापडलेल्या आरोपी महिलेच्या विरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. या कारवाईत एक आरोपी महिला अटक केली गेली आहे तर एक पीडित मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले.
पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. कस्टमर बनलेला पोलिस-सहाय्यक हॉटेलमध्ये पाठवण्यात आला आणि त्याने वेळ साधून इशारा दिल्यावर बाहेरून पोलिसांनी छापा टाकला.छाप्यात विद्या धनराज फुल्केले (४५, शारदा ले-आऊट खरबी येथून) या महिलेला ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून २,५०० रुपये रोख, एक मोबाइल फोन, CCTV DVR, आणि अश्लील सामग्री अशा प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण सुमारे २१ हजार रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. आरोपी व पीडित दोघेही गुन्हे शाखेच्या हुड़केश्वर ठाण्यात सुपुर्द करण्यात आले. त्यांना न्यायालयात सादर केल्यानंतर पीडित मुलगी सुधारगृहमध्ये पाठवण्यात आली आहे, तर आरोपी महिलेला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, सहाय्यक उपायुक्त अभिजित पाटील, क्राईम ब्रांचचे प्रमुख राहुल माकनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीत असलेल्या काही महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावायचे आणि जलद कमाई म्हणून यशराज इनमध्ये फसवले जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिस आता आरोपी महिलेशी संबंधित मोबाईल डेटा, संपर्क नेटवर्क इत्यादींची सखोल छाननी करत आहेत.