शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद व्यक्तींच्या हॉटेलभेटीने खळबळ

By admin | Updated: February 23, 2016 03:26 IST

वर्धा मार्गावरील एका बड्या हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी दोन व्यक्ती येतात. रिसेप्शनिस्ट त्या आगंतुकांचे औपचारिक स्वागत करते.

नरेश डोंगरे ल्ल नागपूरवर्धा मार्गावरील एका बड्या हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी दोन व्यक्ती येतात. रिसेप्शनिस्ट त्या आगंतुकांचे औपचारिक स्वागत करते. त्यांना रूम हवी असावी, असा रिसेप्शनिस्टचा अंदाज असतो. मात्र, तो फोल ठरतो. ‘हम दिल्ली के पुलीस अफसर है’, असे सांगत ते दोघे रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांना असंबद्ध माहिती विचारतात. ‘राकेश’ची चौकशी करतात अन् हॉटेलचे रजिस्टरही ताब्यात घेतात. सैरभर रजिस्टरच्या नोंदी तपासतात अन् हॉटेल प्रशासनाला संशय आल्याचे लक्षात येताच भरभर निघूनही जातात.दहशतवादी, नक्षलवाद्यांचे टार्गेट असलेल्या नागपुरात रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे ‘ते’ दोघे कोण होते, कुठून आले अन् कुठे गेले, याची पोलीस यंत्रणा कसून चौकशी करीत आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉर्इंटमध्ये रविवारी दुपारी दोन तरुण आले.‘आम्ही दिल्ली पोलीस दलातील अधिकारी आहोत’ असा परिचय देत त्यांनी हॉटेलच्या वरिष्ठांना ‘राकेश’ नामक तरुणाबाबत विचारणा केली. कोण राकेश, कुठला राकेश अशा प्रश्नांच्या सरबत्तीनंतर त्यांनी हॉटेलमध्ये चौकशी (झडती) केली. हॉटेलचे रजिस्टरही चेक केले. ते असंबंध माहिती विचारत असल्यामुळे हॉटेल प्रशासनाला संशय आला. त्यामुळे त्यांनी ‘त्या’ कथित अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवायला सांगितले. त्यांनी दिल्ली पोलीसचे ओळखपत्रही दाखवले. मात्र, ते काहीसे कचरले अन् घाईगडबडीने निघून गेले. दरम्यान, त्यांचे एकूणच वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोनेगाव पोलिसांना माहिती देऊन बोलवून घेतले. दुपारी ३ च्या सुमारास सोनेगाव पोलिसांचा ताफा हॉटेलमध्ये पोहचला. तत्पूर्वीच ‘ते’ दोघे हॉटेलमधून निघून गेले होते. त्यामुळे हॉटेलमध्ये जाणाऱ्या पोलिसांनी हे प्रकरण फारसे गंभीरपणे घेतले नाही. वरिष्ठांनाही कळविले नाही. गुन्हे शाखा आयुक्तांकडून दखल ४रविवारी रात्री ही माहिती गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना कळली. त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत लगेच गुन्हेशाखेचा ताफा हॉटेलमध्ये पाठवला. गुन्हेशाखेच्या पथकाने हॉटेल प्रशासनाकडे ‘त्या’ दोघांविषयी सविस्तर चौकशी केली. त्यानंतर हॉटेलमध्ये जाणाऱ्या सोनेगाव ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्याकडे विचारणा करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘त्या’ दोघांबाबत नव्याने चौकशी सुरू झाली. ४सोनेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांनी सोमवारी दुपारी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमधून या दोघांची छायाचित्रे तपासली. मात्र, फुटेज धूसर (अस्पष्ट) असल्यामुळे ते दोघे कोण होते, ते स्पष्ट होऊ शकले नाही. कोणताही वरिष्ठ तपास अधिकारी दुसऱ्या ठिकाणी जाऊन थेट आपला परिचय देत नाही किंवा लगबगीने निघूनही जात नाही. त्याचमुळे ‘त्यांचे’ येणे आणि जाणे जास्त संशयास्पद ठरले आहे. संवेदनशील पार्श्वभूमी४देशभरात अनेक ठिकाणी झालेल्या घातपाती घटनांमध्ये प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. भारताविरोधी घोषणा देण्याचे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणाने देशविदेशात खळबळ उडवली, या बहुचर्चित प्रकरणाचे नागपूर कारागृहात बंदिस्त असलेल्या प्रो. साईबाबाशी थेट कनेक्शन असल्याचा संशय आहे. याच प्रकरणातील उमर खालिद नामक आरोपीने नागपूर-गडचिरोलीची वारी केल्याचे उघड झाले आहे. नागपूर दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर अव्वलस्थानी आहे. हॉटेलच्या बाजूलाच विमानतळ आहे. या सर्व संवेदनशील बाबींमुळे ‘त्या’ दोन संशयितांची ओळख पटणे गरजेचे झाल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.