नागपुरात खळबळ : रेल्वे रुळाजवळ आढळला अनोळखी चिमुकल्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:18 IST2018-10-10T00:17:15+5:302018-10-10T00:18:04+5:30
गड्डीगोदाममधील रेल्वे रुळाजवळ एका चिमुकल्याचा मृतदेह पुरल्याचे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याची हत्या केली असावी, असा कयास आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे.

नागपुरात खळबळ : रेल्वे रुळाजवळ आढळला अनोळखी चिमुकल्याचा मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गड्डीगोदाममधील रेल्वे रुळाजवळ एका चिमुकल्याचा मृतदेह पुरल्याचे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याची हत्या केली असावी, असा कयास आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गड्डीगोदाममधून गोवा कॉलनीपर्यंत जाण्याच्या मार्गात रेल्वेलाईन आहे. रेल्वेलाईनच्या रुळालगत मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एका बालकाचा मृतदेह पुरल्याचे आढळून आले. त्याच्या अंगावर गिट्टी टाकण्यात आली होती. परिसरातील वर्मा यांना हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. सदर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. सदर बालकाच्या नाकातोंडातून रक्त वाहत असल्याने त्याची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला. बालकाची ओळख पटू शकली नाही. त्याचा नरबळी दिला की काय, अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्याला रेल्वेने जाणाऱ्या आरोपीने या भागात रेल्वेची गती कमी होताच खाली उतरवून पुरले असावे, असा संशय आहे. पुढील तपास सुरू आहे.