शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

नागपुरात  स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:46 PM

‘चिगर माईट्स’ नावाचा अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २२ वर पोहचली असून, मृतांची संख्या सहा झाली आहे. ही आकडेवारी एकट्या आॅगस्ट महिन्यातील आहे.

ठळक मुद्देनवे चार रुग्ण आढळले : रुग्णांची संख्या २२

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘चिगर माईट्स’ नावाचा अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २२ वर पोहचली असून, मृतांची संख्या सहा झाली आहे. ही आकडेवारी एकट्या आॅगस्ट महिन्यातील आहे.झाडीझुडपे, गवतात आढळून येणाऱ्या ‘चिगर माईट्स’ या कीटकापासून माणसात संक्रमित होणाºया ‘स्क्रब टायफस’च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) झाल्याने खळबळ उडाली. वाढती रुग्णसंख्या व सहा रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य विभागाला याची दखल घ्यावी लागली. सोमवारी आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मेडिकलनेही यात पुढाकार घेऊन सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेतच मंगळवारपासून ‘स्क्रब टायफस’ची तपासणी सुरू केली. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रयोगशाळेत ‘आयजीएम रॅपिड टेस्ट किट’ उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून तपासणी करण्यास सांगितले जायचे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच सोमवारी मेडिकल प्रशासनाने या विभागाला ‘किट’ उपलब्ध करून दिली. त्यानुसार मंगळवारी तपासणीला सुरुवात झाली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ही चाचणी होत नसल्याने त्यांच्याकडील नऊ ‘स्क्रब टायफस’ संशयित रुग्णांचे नमुने मेडिकलला पाठविले. यात तिघे पॉझिटिव्ह आले, तर मेडिकलमधील चार संशयित रुग्णांचे नमुने तपासले असता एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २२ झाली आहे.इंजेक्शनचा तुटवडास्क्रब टायफसची लक्षणे दिसताच देण्यात येणारे औषध ‘डॉक्सिक्लाईन’ गोळ्यांच्या व इंजेक्शनच्या स्वरूपात मेडिकल उपलब्ध नव्हते. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच सोमवारी आरोग्य विभागाने हजार गोळ्या उपलब्ध करून दिल्या. इंजेक्शन घेण्याची तयारी स्वत: मेडिकलने दाखविली. परंतु आठच इंजेक्शन उपलब्ध करून दिले. सद्यस्थितीत अतिदक्षता विभागात ‘स्क्रब टायफस’चे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. प्रत्येकाला रोज दोन इंजेक्शन द्यावी लागत असल्याने तुटवडा पडला आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य