चावट शेजाऱ्याचे शेकले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST2021-03-07T04:07:44+5:302021-03-07T04:07:44+5:30

पोलिसांनी ठोकल्या बेड्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेजारच्या महिलेसोबत अनेक दिवसांपासून चावटपणा करणाऱ्या एका आरोपीची शेजाऱ्यांनी चांगलीच कानशेकणी ...

Scratched neighbor's scratched ears | चावट शेजाऱ्याचे शेकले कान

चावट शेजाऱ्याचे शेकले कान

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेजारच्या महिलेसोबत अनेक दिवसांपासून चावटपणा करणाऱ्या एका आरोपीची शेजाऱ्यांनी चांगलीच कानशेकणी केली. नंतर लकडगंज पोलिसांनी त्याला अटक केली.

भरत तुकाराम जाखड (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला (वय ३४) आणि आरोपी जाखड शेजारी राहतात. आरोपी कपड्याच्या दुकानात काम करतो.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी जाखड अनेक दिवसांपासून तिला अश्लील हातवारे करून नको तसे इशारे करीत होता. महिलेने त्याच्या चावटपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो निर्ढावला. शुक्रवारी रात्री ७.२० वाजता महिला तिच्या घराच्या टेरेसवर फिरायला आली तेव्हा तिच्या मागे आरोपीही आला. तेथे त्याने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेने आरडाओरड केल्यामुळे घरची मंडळी धावली. त्यांनी आरोपीचे कान शेकले. त्यानंतर लकडगंज पोलिसांना माहिती कळविली. पीएसआय इंगोले यांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेत आरोपी जाखड याला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली.

Web Title: Scratched neighbor's scratched ears