शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

१३ एप्रिलला सायन्स एक्स्प्रेस नागपुरात

By admin | Updated: April 8, 2016 03:10 IST

सायन्स एक्स्प्रेस क्लायमेट अ‍ॅक्शन स्पेशल ट्रेन भारत सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे.

होम प्लॅटफार्मवर थांबणार : हवामानातील बदलावर प्रदर्शननागपूर : सायन्स एक्स्प्रेस क्लायमेट अ‍ॅक्शन स्पेशल ट्रेन भारत सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. हवामान बदल या विषयावर नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने १६ बोगीमध्ये जलवायूविषयी सर्वंकष माहिती असलेली ट्रेन नागपूरमध्ये दिनांक १३ एप्रिल रोजी येत आहे. या रेल्वेगाडीचा शुभारंभ १५ आॅक्टोबर २०१५ रोजी सफदरजंग रेल्वे स्टेशन नवी दिल्लीवरून झाला होता. ७ महिन्यात १९,८०० किलोमिटरचा प्रवास करुन २० राज्यातील ६४ स्टेशनवर थांबल्यानंतर ही एक्स्प्रेस आता नागपुरातील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मवर येणार आहे.विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वतयारीविषयी आढावा बैठक आज झाली. बैठकीत मध्य रेल्वेचे ‘डीआरएम’, जैव वैविधतेचे प्रमुख, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, एनएसएस विभागप्रमुख तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या उपस्थितीत सायन्स एक्स्प्रेसचे स्वागत आणि प्रदर्शनीचे उद्घाटन १३ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मवर होणार आहे. प्रदर्शनीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ एप्रिलला दुपारी ३ वाजता होणार आहे. वातावरण बदल, प्रादेशिक व जागतिक पातळीवर होणारे हवामानातील बदल, कारणे व त्याचे परिणाम, पर्यावरण संतुलित कार्यक्रम, कृषी व जनजीवनावर होणारे परिणाम त्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत एकूण १६ बोगीमध्ये सायन्स प्रदर्शनी राहणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)