मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती, १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार

By आनंद डेकाटे | Published: February 12, 2024 02:39 PM2024-02-12T14:39:18+5:302024-02-12T14:39:36+5:30

Nagpur Education News: मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ जाहीर केली आहे.

Scholarships for Maratha, Kunbi students to pursue higher studies abroad, apply till February 15 | मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती, १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती, १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार

- आनंद डेकाटे 
नागपूर  - मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ जाहीर केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत सारथी संस्थेने या समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीच्या नागपूर विभागीय कार्यालयाचे उप व्यवस्थापकीय संचालक हरिष भामरे यांनी केले आहे. या शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती सारथीच्या www.sarthi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Scholarships for Maratha, Kunbi students to pursue higher studies abroad, apply till February 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.