शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जाहीर होणाऱ्या निकालांचे वेळापत्रक संकेतस्थळावर

By admin | Updated: July 7, 2015 02:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या निकालांना विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे

नागपूर विद्यापीठ : प्र-कुलगुरूंनी घेतला पुढाकारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या निकालांना विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशास्थितीत लवकरातलवकर निकाल लावणे अन् परीक्षा विभागाच्या विस्कळीत कारभाराची घडी सुरळीत करणे ही आव्हाने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्वीकारली आहे. या अंतर्गतच त्यांनी २५ जुलैपर्यंत महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश परीक्षा विभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच कोणकोणत्या दिवशी कुठले निकाल जाहीर करण्यात येतील याची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.विद्यापीठाच्या निकालांची गाडी यंदा रुळावरूनच घसरली आहे. परीक्षा विभाग प्राध्यापकांकडे बोट दाखवत आहे तर प्राध्यापक विद्यापीठाच्या धोरणांना दोषी ठरवत आहे. अशास्थितीत नुकसान मात्र विद्यार्थ्यांचे होत आहे. आतापर्यंत विद्यापीठाच्या एकूण ९५२ परीक्षांपैकी केवळ ३३७ निकालांची घोषणा करण्यात आली आहे. अनेक परीक्षा होऊन तर दोन महिने उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांकडून निर्माण होणारा दबाव लक्षात घेता विद्यापीठाने बीए, बीकॉम व बीएस्सीचे अंतिम वर्षांचे निकाल जाहीर केले. परंतु इतर निकालांचे काय अशी सातत्याने विचारणा होत आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. परंतु निकालच लागले नसल्याने विद्यार्थ्यामध्ये उत्साह नाही व त्यामुळे अनेक ठिकाणी वर्गखोल्यांमध्ये उपस्थिती रोडावल्याचे दिसून येत आहे.प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी आता संकेतस्थळावर निकाल जाहीर होण्याची तारीख टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक सोमवारी प्रकाशित होणार यादीया निर्णयानुसार आता प्रत्येक सोमवारी प्रस्तावित निकालाची तारखेसह यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. सध्या ७ ते २५ जुलैदरम्यान ७७ निकालांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. आता नियमितपणे ही यादी प्रसिद्ध होईल व यात खंड पडणार नाही, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.