शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायल’साठी निधीचा तुटवडा

By admin | Updated: November 6, 2014 02:42 IST

नागपूर-सिकंदराबाद दरम्यान हायस्पीड रेल्वेगाड्या १३० किलोमीटरच्या गतीने चालविण्यासाठी ‘ट्रायल’ घेण्यात निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आनंद शर्मा नागपूरनागपूर-सिकंदराबाद दरम्यान हायस्पीड रेल्वेगाड्या १३० किलोमीटरच्या गतीने चालविण्यासाठी ‘ट्रायल’ घेण्यात निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला त्यासाठी ३५ कोटी हवे आहेत. या रकमेमुळे या मार्गावर ट्रॅक, सिग्नल, पुल आदीशी निगडित सुधार कामे करावयाची आहेत. परंतु निधी न मिळाल्यामुळे ही कामे रखडली आहेत. यामुळे १३० किलोमीटरची गतीची ‘ट्रायल’ रखडली असून या मार्गावर १६० किलोमीटरच्या गतीने गाड्या कधी धावतील हा प्रश्न निर्माण झाला आहे.रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात नागपूर-सिकंदराबाद आणि नागपूर-बिलासपूर दरम्यान १६० किलोमीटरच्या गतीने रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली होती. १६० किलोमीटरपूर्वी १३० किलोमीटर स्पीडच्या गतीसाठी ३५ कोटी रुपये आणि १६० किलोमीटरच्या गतीसाठी १५० कोटी रुपये रेल्वे प्रशासनाला हवे आहेत. ही रक्कम मिळाल्यानंतरच नागपूर-सिकंदराबाद दरम्यान बल्लारशापर्यंत रेल्वे रुळ, सिग्नल, पूल आदीशी निगडित कार्य पूर्ण होऊ शकतील. त्यानंतरच ही ‘ट्रायल’ घेणे शक्य होणार आहे. सप्टेबर महिन्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी सांगितले की १६० किलोमीटरच्या पूर्वी १३० किलोमीटरच्या गतीने ‘ट्रायल’ आॅक्टोबर महिन्यात घेण्यात येऊ शकते. त्यामुळे रेल्वे रुळाच्या स्थितीची माहिती मिळेल. भविष्यात कोणती कामे करावयाची आहेत याचाही खुलासा होईल. या कामाचा सर्वेक्षण अहवाल मुंबई मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी नागपुरात आलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी हायस्पीड रेल्वेगाड्यांविषयीची माहिती रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली होती. परंतु निधीची व्यवस्था न झाल्यामुळे हे काम रखडल्याची माहिती आहे.