शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

एससी-एसटी-ओबीसींनो, आपली सत्ता मिळवा: प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:08 PM

प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

ठळक मुद्देस्कॉलरशिप परिषदेत आवाहन

नागपूर : आरक्षित जागांवरून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी हे गुलाम आहेत. त्यांच्याकडून काही होणार नाही. आपल्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवायच्या असतील तर शासन आपल्या हातात असायला हवे. शासनात एक किंवा दोन माणसे पाठवून काहीही होणार नाही. शासनाच्या धोरणात सहभागी व्हावे लागेल आणि त्यासाठी किमान ५० पेक्षा अधिक माणसे पाठवा. एस.सी., एस.टी., ओबीसी, व्हीजेएनटी सत्तेत बसले तर त्यांना कुणाला न्याय  मागण्याची गरज नाही. केवळ नियोजनाची आवश्यकता आहे, हे नियोजनच देशाचे संविधान वाचवू शकते. तेव्हा आपली सत्ता मिळवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केले.संजीवनी ह्यमन डेव्हलपमेंट संस्था, आदिवासी विद्यार्थी संघ, बहुजन विद्यार्थी संघ, युवाज वुई द युथ आदींसह विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे स्कॉलरशिप परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, स्कॉलरशिपचा विषय आपण गेल्या ४० वर्षातही सोडवू शकलो नाही. १९७२ मध्ये ज्यावर बोलले जात होते. तेच आजही बोलतो. परंतु तेव्हा समस्यांवर उपायसुद्धा सुचविले जायचे. आज ती परिस्थिती दिसत नाही. विषम परिस्थिती व विषम शिक्षण जोपर्यंत आहे. तसेच शासन शिक्षणाची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत आरक्षण व स्कॉलरशिप मिळायलाच हवी. महाराष्ट्र सरकार हे सर्वाधिक प्रतिगामी सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकार जितकी स्कॉलरशिप देते तितकीच विद्यार्थ्यांना मिळते. राज्य सरकारचा त्यात कुठलाही हिस्सा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी ओबीसी एकता मंचचे अध्यक्ष सुनील पाल, समता सैनिक दलाच्या अ‍ॅड. स्मिता कांबळे, आदिवासी विद्यार्थी संघाचे विलास उईके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अतुल खोब्रागडे, डॉ. आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अमन कांबळे यांनी केले. संचालन प्रीतम बुलकुंडे यांनी केले. प्रफुल भालेराव यांनी आभार मानले. प्रज्ञा सालवटकर, लक्ष्मीकांत सुदामे, नवनीत कांबळे, सम्राट उंदीरवाडे, धम्मपाल माटे, मनीष पाटील, प्रवीण वानखेडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.विदर्भ हे आंबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकतेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले होते, याची सर्वानाच माहिती आहे. परंतु का केले, हे मात्र कुणाला सांगता येत नाही. विदर्भ हे आंबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकते. ते देशातील शोषित वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे केंद्र ठरू शकते, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला मत द्यायला हवे, असे नागपूरच्या जनतेला वाटते. पण आपण येथे २८ टक्के आहोत. इतर समाजाला सोबत घेऊन आपण स्वत:च इथले सत्ताधारी होऊ शकतो, असे मात्र तुम्हाला वाटत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.स्कॉलरशिप मिळायलाच हवी , पण जे विद्यार्थीच नाही त्यांचे काय?आपण टीकाकार आहोत, निर्माते नाहीत, अशी टीका आपल्यावर नेहमी केली जाते. त्यामुळे आता आपल्याला निर्मात्यांच्या भूमिकेत यावे लागेल. स्कॉलरशिपचा मुद्दा हा विद्यार्थ्यांशी संंबंधित आहे. स्कॉलरशिप मिळायलाच हवी. परंतु जे विद्यार्थी होऊ शकले नाही, त्यांचे काय? त्यांचा विचारही करावा लागेल. ते विद्यार्थी कसे होतील, हे पाहावे लागेल. सर्वानांच शिक्षण मिळायला हवे. या देशातील व्यक्ती किमान दहावीपर्यंत शिकलेली असावी, यासाठी दहावीपर्यंत शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी मागणी आपली असायला हवी, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSC STअनुसूचित जाती जमातीOBCअन्य मागासवर्गीय जातीScholarshipशिष्यवृत्ती