शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

थेंबाथेंबाची बचत व्हावी

By admin | Updated: May 22, 2016 02:47 IST

‘लोकमत’ च्या ‘जलमित्र सेल्फी’ या उपक्रमाला विदर्भातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

‘सेल्फी’ ला प्रतिसाद : पाणी बचतीचा संदेश नागपूर : ‘लोकमत’ च्या ‘जलमित्र सेल्फी’ या उपक्रमाला विदर्भातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील वाचकांकडून पाणी बचतीच्या संदेशासह मोठ्या प्रमाणात ‘सेल्फी’ प्राप्त होत आहेत. यात शनिवारी उपराजधानीसह विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा येथील वाचकांनी ‘लोकमत’ कडे शेकडो सेल्फी पाठविल्या. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ ने राज्यभरात ‘जलमित्र’ अभियान सुरू केले आहे. या सहा आठवड्याच्या अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, सध्या ‘जलमित्र सेल्फी’ हा खास उपक्रम राबविल्या जात आहे. यात ‘लोकमत’ च्या वाचकांना पाणी बचतीचा संदेश देणारा स्वत:चा सेल्फी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार ‘लोकमत’ कडे प्राप्त होणाऱ्या सेल्फीमधून काही निवडक सेल्फी प्रकाशित केल्या जात आहे. ‘जलमित्र’ अभियानाला सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख रेस्टारंट आणि हॉटेल्समध्ये विविध जनजागृतीचे कार्यकम राबविण्यात आले. शिवाय हॉटेल्समध्ये पाणी बचतीचा संदेश असलेले पोस्टर्स, स्टॅन्डी व टेबल कार्ड ठेवून, तेथील वेटर्स व कर्मचाऱ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. एवढेच नव्हे, तर सर्व हॉटेल्स व रेस्टरंटमध्ये ‘लोकमत’ तर्फे एक ड्रम ठेवून, त्यात ग्राहकांच्या ग्लासातील शिल्लक पाणी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यातून रोज प्रत्येक हॉटेल व रेस्टारंटमध्ये हजारो लिटर पाण्याची बचत झाली. यानंतर त्या पाण्याचा त्याच हॉटेल व रेस्टारंटमध्ये इतर कामासाठी उपयोग करण्यात आला. आता या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने ‘जलमित्र सेल्फी’ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)