संस्कृत नाटकात परिवर्तन हाेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST2021-09-02T04:17:21+5:302021-09-02T04:17:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : संस्कृत नाटकामध्ये युगानुकूल परिवर्तन हाेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्कृत नाट्यलेखक, दिग्दर्शक डाॅ. प्रसाद ...

Sanskrit drama needs to change | संस्कृत नाटकात परिवर्तन हाेणे आवश्यक

संस्कृत नाटकात परिवर्तन हाेणे आवश्यक

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : संस्कृत नाटकामध्ये युगानुकूल परिवर्तन हाेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्कृत नाट्यलेखक, दिग्दर्शक डाॅ. प्रसाद भिडे यांनी केले. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाच्या जनसंपर्क कक्षातर्फे युवास्पंद उपक्रमात चतुर्थ व्याख्यानप्रसंगी आधुनिक युगात संस्कृत नाटकाची प्रयाेगाभिमुखता या विषयावर ते बाेलत हाेते.

संस्कृत महाेत्सवाच्या निमित्ताने आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीक्षक प्रा. नंदापुरी हाेत्या. यावेळी कुलसचिव डाॅ. हरेकृष्ण अगस्ती, महाेत्सवाचे विस्तार सेवा संचालक प्रा. कृष्णकुमार पांडेय, जनसंपर्क कक्षप्रमुख डाॅ. रेणुका बाेकारे, समन्वयिका प्रा. वरदा माळवे आदींची उपस्थिती हाेती. पुढे बाेलताना डाॅ. भिडे म्हणाले, संस्कृत नाटक युवकापर्यंत पाेहाेचवायचे असेल तर प्राचीन संस्कृत नाटकाची नवीन रंगावृत्ती तयार करावी लागेल व त्यात काळानुरूप बदल करावा लागेल. विस्तृत असलेली संस्कृत नाटके संक्षिप्त करावी लागतील. तसेच भाषा, संहिता व पात्रे यांच्यात बदल करून नाटकाच्या आशय संरचना यामध्ये युगानुकुल बदल करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. नंदापुरी यांनी अध्यक्षीय भाषणात प्राचीन संस्कृत नाटके ही भरत नाट्यशास्त्रानुसार लिहिली गेली आहेत. भरत नाट्यशास्त्र समजून घ्यायचे असेल तर संस्कृत नाटकाचा अभ्यास प्रयाेगाच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वरदा माळवे यांनी केले. डाॅ. श्वेता शर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित हाेते.

Web Title: Sanskrit drama needs to change