शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी’तून ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ उपलब्ध करुन द्या : भाजप आमदारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:25 IST

‘कोरोना’मुळे शहरातील नागरिकांना ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत आरोग्यविषयक सामग्री उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यामुळेच ‘डीपीसी’ किंवा आमदार निधीतून ‘सॅनिटायझर’ व ‘मास्क’ उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी शहरातील तीन भाजप आमदारांनी केली आहे.

ठळक मुद्देकर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे शहरातील नागरिकांना ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत आरोग्यविषयक सामग्री उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यामुळेच ‘डीपीसी’ किंवा आमदार निधीतून ‘सॅनिटायझर’ व ‘मास्क’ उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी शहरातील तीन भाजप आमदारांनी केली आहे. यासंदर्भात आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते व आ. विकास कुंभारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहिले आहे.नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे ‘सॅनिटायझर’ व ‘मास्क’ हे ‘डीपीसी’ किंवा आमदार निधीतून उपलब्ध करून देण्यात आले तर ते जनतेपर्यंत सहजतेने पोहोचवता येतील, अशी भूमिका यात खोपडे, मते व कुंभारे यांनी मांडली आहे. ‘लॉकडाऊन’मुळे शहरात ई-रिक्षा व ऑटो चालणे बंद झाले आहे. त्यांचे दैनंदिन जगणेदेखील कठीण झाले आहे. अशा स्थितीत कर्जाचे हफ्ते भरणे त्यांना शक्य नाही. मात्र बँका व खासगी व्यक्ती कर्जाचे हफ्ते चुकवा यासाठी त्यांच्यामागे तगादा लावत आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. तसेच या कालावधीत त्यांच्याकडून व्याज किंवा दंड घेण्यात येऊ नये, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

एप्रिलमधील लग्न समारंभ रद्द करादेशात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ असला तरी हा कालावधी वाढू शकतो. एप्रिल महिन्यात अनेक लग्न आहेत. ३० एप्रिलपर्यंत लग्नसमारंंभासाठी सभागृह अथवा लॉन देऊ नये असे प्रशासनाने कळविणे आवश्यक आहे. असे झाले तर सभागृहचालक तसेच लग्न असणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळेल. एक महिनाअगोदर कळले तर ते घरच्या घरीदेखील लग्न समारोह आयोजित करूशकतात, अशी भूमिका तिन्ही आमदारांनी मांडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMLAआमदार