शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीचे नागपुरातही जाळे

By admin | Updated: December 30, 2015 03:16 IST

फसवणुकीची सप्रमाण माहिती असूनही तपास यंत्रणांकडून संबंधित फायनान्स कंपनीच्या ठगबाजांवर तातडीने कारवाई झाली नाही.

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका : तपास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा नरेश डोंगरे नागपूरफसवणुकीची सप्रमाण माहिती असूनही तपास यंत्रणांकडून संबंधित फायनान्स कंपनीच्या ठगबाजांवर तातडीने कारवाई झाली नाही. त्यामुळे कंपनीच्या ठगबाजांनी गेल्या १० महिन्यात हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.‘समृद्ध जीवना’चे आकर्षण दाखवून कंपनीच्या ठगबाजांनी राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका दिला. त्यात नागपूर-विदर्भातीलही सुमारे दोन हजार गुंतवणूकदार असल्याची माहिती आहे. ‘समृद्ध’चे संचालक आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून करोडो रुपये गोळा करीत असल्याची कुणकुण राज्यातील तपास यंत्रणांना लागली. भक्कम पुरावे मिळाल्यानंतर तपास यंत्रणा गेल्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून कंपनीच्या जाळ्यात अडकलेल्यांकडून तक्रारी मिळविण्यासाठी कामी लागली. सीआयडीने नागपूरच्या गुन्हे शाखेला दोन हजारांवर गुंतवणूकदारांची माहिती देऊन शहानिशा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने अनेकांकडे ‘फोनोफ्रेण्ड’ केले. अनेकांनी आपण रक्कम गुंतवल्याचे मान्य केले. कंपनीचे सध्या चांगले दिवस नसल्याने आमचे पैसे थकीत झाले. मात्र, कंपनीच्या संचालकांशी बोलणी झाली असून आमची रक्कम परत मिळणार असल्याचे सांगून त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे अनेक गुंतवणूकदारांनी फसवणुकीची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून दिली. रक्कम अडकल्याचेही सांगितले. परंतु पोलिसांनी त्यांना तक्रारीसाठी प्रोत्साहित केले नाही किंवा कारवाईसाठी उत्सुकता दाखविली नाही. गुंतवणूकदारांच्या चौकशीचा अहवाल सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होऊनही तपास अधिकाऱ्यांनी तटस्थ भूमिका स्वीकारल्याने नऊ ते दहा महिन्यांत या कंपनीच्या ठगबाजांना आणखी हजारो गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणे आणि त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणे शक्य झाले. मालमत्तेची विल्हेवाटतपास अधिकाऱ्यांनी कंपनीच्या ठगबाजांविरुद्ध तक्रारी दाखल करून घेण्यासाठी का उत्सुकता दाखविली नाही, हा संशय वाढवणारा मुद्दा आहे. त्याची कशा पद्धतीने सरकार दखल घेणार, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे. परंतु तपास अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी तत्परता दाखविली नाही म्हणून या ठगबाजांनी अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी हिसकावून घेतली, ही संतापजनक बाब त्यातून अधोरेखित झाली आहे. दुसरे म्हणजे, याचमुळे कंपनीच्या ठगबाजांनी जमविलेल्या कोट्यवधीच्या मालमत्तेची पद्धतशीर विल्हेवाट लावणेही शक्य झाले.शहानिशा करण्याच्या सूचना यासंदर्भात गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्याकडे विचारणा केली असता, समृद्ध जीवनविरुद्ध ‘सीआयडीकडे एफआयआर दाखल झाला होता’. आम्हाला सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांची यादी मिळाली होती. त्याआधारे आम्ही अनेकांकडे चौकशी केली. त्यातील काहींनी आमचे सेटलमेंट होणार आहे, असे सांगितले, तर काहींनी आमची फसवणूक झाल्याचे फोनवर सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र कुणी आमच्याकडे तक्रार दिली नाही, असे त्या म्हणाल्या.