शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मनपा कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगानुसार वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:13 PM

वेतन न मिळाल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा विचार करता प्रशासनाने ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देऑगस्ट महिन्याचे वेतन देण्याचे निर्देश : शासन निर्णयानंतर फरकासह सातवा वेतन आयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी देतील अशा आशेवर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबले आहे. परंतु वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची अडचणी वाढल्या आहेत. याचा विचार करता प्रशासनाने ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे. शासन मंजुरीनंतर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देताना फरकाची रक्कम देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली.कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येईल असे आश्वासन प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र महापालिकेचा प्रस्ताव नाकारून सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव पाठविला. परंतु राज्य सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. निर्णयाच्या प्रतीक्षेत ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबले आहे. परंतु पुढील आठवड्यात होणारा बँक कर्मचाऱ्यांचा संप विचारात घेता शासन निर्णयाची अधिक प्रतीक्षा न करता सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी वेतन देण्याला सुरुवात होणार आहे.कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सचिन कुर्वे तसेच नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी शुक्रवारी विशेष सभेनंतर पत्रकारांना दिली. राज्यातील इतर महापालिकेकडून वेतन आयोगाचे प्रस्ताव सादर करण्याला विलंब होत असल्याने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन द्या, अशी सूचना म्हैसकर यांनी केल्याचे जोशी यांनी सांगितले. परंतु महापालिका आयुक्तांनी दुपारपर्यंत शासन निर्णयाची प्रतीक्षा करू अन्यथा सहाव्या वेतन आयोगानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊ न वेतन आयोगासंदर्भात चर्चा केली.शासन निर्णयानंतर फरकाची रक्कम देणारसातव्या वेतन आयोगासंदर्भात अद्याप राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. वेतनाला विलंब होत असल्याने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.आंदोलनात पुढाकार घेणारे कर्मचारी धास्तावलेमहापालिकेत सातव्या वेतन आयोगासाठी आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा हालचाली सुरू असल्याने कर्मचारी धास्तावले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जाणीवपूर्वक बदल्या केल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांनी दिला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी