शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

धावणार माझी मेट्रो : फिडर सर्व्हिसेससाठी कर्मचारी उत्सुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 8:39 PM

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या फिडर सर्व्हिसेस अंतर्गत मिहान येथील हिंदुस्थान कॉम्पुटर लिमिटेडच्या (एचसीएल) अधिकाऱ्यांनी सायकल आणि ई-सायकलची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची ई-सायकलची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या फिडर सर्व्हिसेस अंतर्गत मिहान येथील हिंदुस्थान कॉम्पुटर लिमिटेडच्या (एचसीएल) अधिकाऱ्यांनी सायकल आणि ई-सायकलची मागणी केली आहे.यामुळे कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यालय ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत सायकलचा वापर करू शकतील. इतकेच नव्हे तर कंपनी परिसरातदेखील सायकल चालवायला आवडेल, अशी इच्छा येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महामेट्रो नागपूरच्या ‘धावणार माझी मेट्रो मोहिमेंतर्गत’ मिहान येथे एचसीएल कंपनीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.महामेट्रो नागपूरच्या धावणार माझी मेट्रो मोहिमेला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महामेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना कर्मचाऱ्यांसाठी ही मोहीम आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी ‘धावणार माझी मेट्रो’सोबत सेल्फी काढली. तसेच महामेट्रोतर्फे फिडर सर्व्हिसेससंबंधी सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या माहितीच्या आधारावर ऑनलाईन प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहात उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एलसीडी स्क्रीनवरून महामेट्रो नागपूर आणि फिडर सर्व्हिसेससंबंधी प्रश्न विचारण्यात आले. सर्वांनी प्रश्नांची उत्तरे आपल्या मोबाइलवरून दिली. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आलीत.‘धावणार माझी मेट्रो’वर कर्मचाऱ्यांनी महामेट्रोला शुभेच्छा दिल्या. महामेट्रोने वितरित केलेल्या सूचना पत्रावर कर्मचाऱ्यांनी सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. दिलेल्या सूचनांवर विचार करून त्या सूचना पाळण्याचे आश्वासन महामेट्रोच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. लवकरच महामेट्रो नागपूर प्रकल्पाचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे. नागरिकांनी मेट्रोतून मोठ्या संख्येने प्रवास करावा. त्यामुळे रस्त्यावर होणारे प्रदूषण कमी होईल आणि फिडर सर्व्हिसेसला खऱ्या अर्थाने यश प्राप्त होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोEmployeeकर्मचारी