अफवेचा कहर ! पाणी मागणाऱ्या वृद्धेला 'मुले चोरणारी' समजून जमावाकडून बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 18:56 IST2026-03-14T18:50:29+5:302026-03-14T18:56:11+5:30

Nagpur : सोशल मीडियावरून वेगाने प्रसारित होणाऱ्या 'मुले पळवणाऱ्या टोळी'च्या निराधार अफवांनी नागपुरात एका निष्पाप वृद्धेचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी भागात ही खळबळजनक घटना घडली.

Rumors spread! An elderly woman asking for water was brutally beaten up by a mob, mistaking her for a 'child thief' | अफवेचा कहर ! पाणी मागणाऱ्या वृद्धेला 'मुले चोरणारी' समजून जमावाकडून बेदम मारहाण

Rumors spread! An elderly woman asking for water was brutally beaten up by a mob, mistaking her for a 'child thief'

नागपूर : सोशल मीडियावरून वेगाने प्रसारित होणाऱ्या 'मुले पळवणाऱ्या टोळी'च्या निराधार अफवांनी नागपुरात एका निष्पाप वृद्धेचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी भागात ही खळबळजनक घटना घडली. केवळ पिण्यासाठी पाणी मागितले असता, भाषेच्या अडचणीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून एका ६० वर्षीय वृद्धेला जमावाने 'मुले चोरणारी' समजून बेदम मारहाण केली. सुदैवाने, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतल्यामुळे या वृद्धेचे प्राण वाचले.

संबंधित वृद्ध महिला आपल्या नियमित उपचारांसाठी रुग्णालयात गेल्या होत्या. औषधे घेऊन घरी परतत असताना दुपारच्या सुमारास त्यांना प्रचंड थकवा जाणवला. औषध घेण्याची वेळ झाल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या आणि जवळच खेळणाऱ्या एका लहान मुलाकडे त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, या वृद्धेला मराठी किंवा हिंदी भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांनी आपल्या मातृभाषेत (भोजपुरी) संवाद साधला. हाच भाषेचा अडथळा त्यांच्यासाठी संकटाचे कारण ठरला.

​त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या एका महिलेने या परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावला. ही वृद्ध महिला लहान मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा खोटा आरोप करत त्या महिलेने आरडाओरडा सुरू केला. या आवाजामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. जमावाने कोणतीही शहानिशा न करता त्या वृद्धेवर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. पीडित महिला आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कोणालाही त्यांचे बोलणे समजत नसल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न लावता घटनास्थळ गाठले आणि जमावाच्या तावडीतून वृद्धेची सुटका केली. त्यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या मुलाला व सुनेला पाचारण करण्यात आले. चौकशीअंती ती महिला पूर्णपणे निर्दोष असल्याचे आणि केवळ औषधासाठी पाणी मागत असल्याचे सत्य समोर आले.

नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या वादातीत आणि तथ्यहीन अफवा मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. संशयास्पद हालचाली आढळल्यास कायदा हातात घेण्याऐवजी त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.

Web Title : अफ़वाह का कहर: पानी मांगने वाली वृद्धा को बच्चा चोर समझकर पीटा

Web Summary : नागपुर: पानी मांगने पर एक वृद्धा को बच्चा चोर समझकर भीड़ ने पीटा। भाषा की समस्या के कारण ग़लतफ़हमी हुई। पुलिस ने बचाया, वृद्धा निर्दोष निकली। पुलिस ने अफ़वाहों से सावधान रहने और संदिग्ध गतिविधियों की सूचना देने की अपील की है।

Web Title : Mob Violence: Elderly Woman Mistaken for Child Thief, Assaulted

Web Summary : Nagpur: An elderly woman, seeking water, was brutally attacked by a mob fueled by child-theft rumors. Misunderstanding due to language differences led to the assault. Police rescued her, confirming her innocence. Authorities urge public vigilance against false social media claims and to contact police with concerns.