शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पारशी महिलांनी आंतरधर्मीय विवाह केल्यास स्वःधर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:52 IST

Nagpur : आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या पारशी महिलांना स्वः धर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांच्या वैधतेला नागपूर येथील पारशी महिला दीना बुधराजा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या पारशी महिलांना स्वः धर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांच्या वैधतेला नागपूर येथील पारशी महिला दीना बुधराजा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या वादग्रस्त नियमांचा नागपूर पारशी पंचायतच्या घटनेमध्ये समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात नागपूर पारशी पंचायतचे सचिव, केंद्रीय महिला व बालविकास विभागाचे सचिव, अल्पसंख्याक विभागाचे सचिव, राज्याचे मुख्य सचिव आणि धर्मादाय आयुक्त यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरणावर सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या न्यायपीठापुढे सुनावणी झाली. नागपूर पारशी पंचायतच्या घटनेमधील ५(२) व ५ (३) या नियमांतील तरतुदीवर बुधराजा यांनी आक्षेप घेतला आहे. हे नियम इतर धर्माच्या व्यक्तीशी विवाह करणाऱ्या पारशी महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करतात. महिलेला पारशी मानले जात नाही. तिचे पारशी धर्माचे अधिकार हिरावून घेतले जातात. तिला 'अग्यारी' या पारशी प्रार्थनास्थळात प्रवेश नाकारला जातो. परंतु, हे नियम पुरुषाचा पारशी दर्जा कायम राखतात. 

त्यामुळे हे वादग्रस्त नियम भारतीय संविधानाने नागरिकांना बहाल केलेल्या लिंग समानता आणि धार्मिक व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करतात, असा दावा बुधराजा यांनी याचिकेत केला आहे. तसेच, दिल्ली आणि कोलकातासह इतर अनेक पारशी पंचायतीच्या घटनेमध्ये असे भेदभावपूर्ण नियम नाहीत. त्यांचे नियम पुरुष व महिलांना समान वागणूक देतात. त्यामुळे नागपूर पारशी पंचायतच्या घटनेमधील वादग्रस्त नियम असंवैधानिक ठरवून रद्द करण्यात यावे आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या पारशी महिलांचे स्वःधर्मीय अधिकार कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे. बुधराजा यांच्यावतीने वरिष्ठ अॅड. श्याम दिवाण व अॅड. आर. एम. भांगडे यांनी कामकाज पाहिले.

धर्म बदलला नाही

बुधराजा यांनी २७ नोव्हेंबर २००९ रोजी हिंदू पुरुषासोबत विवाह केला असून त्याची विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. बुधराजा यांनी विवाहानंतर धर्म बदलला नाही. त्या पारशी धर्माचेच पालन करीत आहेत. तसेच, त्यांनी दोन मुलांचे संगोपनही पारशी धर्म व परंपरेच्या वातावरणात केले आहे. असे असताना नागपूर पारशी पंचायतने त्यांना आजीच्या निधनानंतर 'अग्यारी'मध्ये प्रार्थना करण्याची परवानगी नाकारली. त्यांना वन्हांड्यात बसण्याचे निर्देश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Parsi woman challenges discriminatory marriage rules in Supreme Court.

Web Summary : A Parsi woman challenges rules denying religious rights to women in interfaith marriages in court. The rules discriminate against women marrying outside the community, denying them religious access, while men retain their rights. She claims it violates fundamental rights.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर