शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरा फॉरेस्ट कॉलनीची जागा आरटीओला

By admin | Updated: July 17, 2014 01:03 IST

सध्या उपराजधानीत एक इंच जागा कुणी एक दुसऱ्याला देण्यास तयार नसताना, वन विभागाने मात्र इंदोरा येथील वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची १.८७ हेक्टर जागा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला

वन विभागाचा अजब निर्णय : वन कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध नागपूर : सध्या उपराजधानीत एक इंच जागा कुणी एक दुसऱ्याला देण्यास तयार नसताना, वन विभागाने मात्र इंदोरा येथील वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची १.८७ हेक्टर जागा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला हस्तांतरित करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वन विभागाच्या या निर्णयावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे; शिवाय वसाहतीमधील वन कर्मचारी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वनमजूर संघटनेच्या माध्यमातून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांना निवेदन सादर करून, हा निर्णय ताबडतोब मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. माहिती सूत्रानुसार, गत २ एप्रिल १९८० रोजी तत्कालीन नझुल तहसीलदारांनी मौजा इंदोरा येथील सर्वे क्र. ६०, ६१/१, १०६/२ मधील एकूण ८.५४ एकर जागा वन विभागाला हस्तांतरित केली होती. ती जागा वन विभागाच्या इमारती व नर्सरीसाठी देण्यात आली होती. यानंतर या जमिनीपैकी सर्वे क्र. १०६/२ मधील १.५४ एकर जागेवर वन विभागाच्यावतीने वन कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधण्यात आली. शिवाय इतर ५ एकर जमीन वन विकास महमंडळला (एफडीसीएम) इमारत बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला राज्य शासनाने मंजुरीही प्रदान केली होती. परंतु एफडीसीएमने तिथे आपली इमारत बांधण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात आली. यानंतर लगेच खसरा क्र. १०६/२ नगर भूमापन क्र. ५३६/१ मधील १.८७ हेक्टर जमीन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) यांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यालाही राज्य शासनाने मंजुरी दिली. त्याआधारे नागपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी काही अटी व शर्तीच्या आधारे ही जागा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पूर्व नागपूर यांना कार्यालयीन वापराकरिता देण्यास हरकत नसल्याच्या शिफारशीचा एक प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांच्याकडे सादर केला. त्यावर तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांनी गत जून महिन्यात अगदी सेवानिवृत्तीपूर्वी शिक्कामोर्तब करून, तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या वसाहतीमधील वन कर्मचाऱ्यांनी ही जागा आरटीओला देण्यास सतत विरोध केला आहे. मात्र वन विभागाने त्यांच्या या विरोधाची कोणतीही पर्वा न करता, हा तुघलकी निर्णय घेतला. यात सुरुवातीला मुख्य वनसंरक्षकांनी वन मुख्यालयाकडे पाठविलेला असाच एक प्रस्ताव वन मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला होता. परंतु मुख्य वनसंरक्षकांनी काही दिवसानंतर पुन्हा नवीन प्रस्ताव वनबलप्रमुखांकडे सादर केला. (प्रतिनिधी)