शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’ ची ढकलगाडी

By admin | Updated: April 30, 2015 02:17 IST

‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत घोळात घोळ सुरू आहेत.

नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत घोळात घोळ सुरू आहेत. परंतु राज्य शासनातर्फे अद्यापही यावर ठोस निर्णयाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीदेखील यावर मौन बाळगले असून आता नेमके करावे तरी काय, असा प्रश्न पालकांना पडला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आरटीई’अंतर्गत पहिल्या वर्गापासूनच प्रवेश देणे शाळांना बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येईल.‘आॅनलाईन’ सोडत झाल्यानंतर ‘आरटीई’ प्रवेशामधील खरा गुंता सुरू झाला. शहरातील अनेक शाळांनी ‘एन्ट्री लेव्हल’ नर्सरी असल्याचे कारण देत पहिलीचे प्रवेश नाकारले तर दुसरीकडे ‘मेस्टा’ अंतर्गत (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन) येणाऱ्या ८० ते ९० शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत ‘नर्सरी’त प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पालकांना वणवण हिंडावे लागत आहे. कुणी मुख्याध्यापकांकडे आर्जव करत आहे तर कुणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या असून ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णयदेखील झाला आहे. परंतु अद्याप याबाबतचे शासननिर्देश जारी झालेले नाहीत. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यास शासनाकडून विलंब का लावण्यात येत आहे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)