शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांना ज्या शाळा शिक्षण देतात, त्या शाळांना शासनातर्फे पैसा दिला जातो. शिक्षण हक्क कायदा ...

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांना ज्या शाळा शिक्षण देतात, त्या शाळांना शासनातर्फे पैसा दिला जातो. शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत शासनाने तरतूद केली आहे. पण, चार वर्षांपासून आरटीईत नोंदणीकृत शाळांना शासनाकडून प्रतिपूर्तीच मिळालेली नाही. शालेय शिक्षण विभागाने २०२१-२२ चा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण, शाळांनी प्रतिपूर्ती नाही, तोपर्यंत प्रवेश नाही, असा इशारा दिला आहे.

आरटीईमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांच्यासाठी जो निधी दिला जातो, त्यात केंद्र सरकारचा ६० टक्के व राज्य सरकारचा ४० टक्के वाटा असतो. केंद्र सरकार दरवर्षी हा निधी राज्य सरकारला देते. पण, राज्य सरकारकडून शाळांना हा निधी वितरित केलाच जात नसल्याचा आरोप शाळांच्या संचालकांनी केला आहे. शाळा संचालकांचा आरोप आहे की, राज्य सरकार आरटीईच्या प्रतिपूर्तीत योगदानच देत नाही. शासनाने २०१७-१८ मध्ये ५० टक्के, २०१८-१९ मध्ये २५ टक्के प्रतिपूर्ती शाळांना दिली. पण, २०१९-२० व २०२०-२१ या वर्षातील एक रुपयाही शाळांना दिलेला नाही.

विशेष म्हणजे, आरटीईत नोंदणीकृत असलेल्या बहुतांश शाळा या स्वयंअर्थसाहाय्यित आहे. शासनाकडून कुठलेही अनुदान या शाळांना मिळत नाही. विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शैक्षणिक शुल्काच्या भरवशावर संस्थाचालक शाळा चालवितात. कोरोनामुळे सलग १० महिन्यापासून शाळा बंद आहे. विद्यार्थ्यांकडून शाळांना शुल्क मिळालेले नाही. शाळा चालविणे संस्थाचालकांसाठी कठीण झाले आहे. अशा काळातही सरकारने आरटीईचा हक्काचा निधी शाळांना दिला नाही. अशात पुन्हा २०२१-२२ या सत्रासाठी आरटीईच्या प्रवेशाचा कार्यक्रम जाहीर केल्याने, संस्थाचालकांमध्ये प्रचंड संताप आहे.

- शासनाकडून दखलच नाही

सलग चार वर्षांपासून आरटीईचा एक रुपया शाळांना मिळाला नाही. कोरोनाच्या काळात आम्ही अडचणीत असताना हक्काचा निधीसुद्धा दिला नाही. आम्ही आरटीईत मुलांना शिकवायला तयार आहोत. चार वर्षे हक्काचे पैसे मिळत नसतील, तर हा अन्याय कितपत सहन करायचा? नव्या सत्रासाठी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण, यंदा प्रतिपूर्ती मिळणार नाही, तोपर्यंत प्रवेश देणार नाही.

- कपिल उमाळे, विभागीय सचिव, मेस्टा