शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

सत्य, अहिंसेच्या जोरावर भारतीय व्यक्तीच राजकारण करु शकते; सरसंघचालकांकडून गांधीजींच्या कार्याचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 9:44 AM

संघाच्या व्यासपीठावरुन मोहन भागवत यांच्याकडून महात्मा गांधीजींच्या कार्याचं कौतुक

नागपूर: सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकतं, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे, अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांचं कौतुक केलं आहे. ज्यांचा साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता, अशा इंग्रजांचा सामना महात्मा गांधीजींनी निशस्त्रपणे केला. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी दोन हात केले, असं भागवत म्हणाले. संघ मुख्यालयात आज विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी महात्मा गांधींच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. सध्या अतिशय लहानसहान गोष्टीदेखील मोठ्या करुन त्याबद्दल आंदोलनं केली जातात, असं म्हणत सरसंघचालकांनी जेएनयूमधील डाव्या विद्यार्थी संघटनांना लक्ष्य केलं. 'भारत तेरे तुकडे होंगेच्या घोषणा देणारे, दहशतवाद्यांशी संबंध असणारे लोक आंदोलनांमध्ये दिसतात. याचा राजकीय लाभदेखील घेतला जातो. यामागे पाकिस्तान आणि इटलीचा हात आहे. आजकाल शहरी माओवाददेखील उफाळून आला आहे. काही लोकांना बंदुकीच्या जोरावर सत्ता मिळवायची आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी डाव्या संघटनांवर निशाणा साधला. भारत पंचामृताच्या मंत्राच्या आधारे पुढे गेला, तर नक्की महागुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणीही आमचं शत्रू नाही. आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही. मात्र जगातील अनेकजण आम्हाला शत्रू मानतात, असं सरसंघचालक म्हणाले. पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झालं. मात्र त्यांच्या कृती आणि कारवायांमध्ये फरक पडलेला नाही. कोणीही आपल्यावर हल्ला करण्याचा विचारसुद्धा करु शकणार नाही, इतकं सामर्थ्यशाली आपण व्हायला हवं, असं सरसंघचालक भागवत यांनी म्हटलं. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूर