आरपीएफ महिला पथक : काजीपेठ पॅसेंजरमध्ये दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:58 IST2018-12-27T22:57:20+5:302018-12-27T22:58:37+5:30
अजनी रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला पथकाने काजीपेठ पॅसेंजरच्या जनरल कोचमध्ये ६६५५ रुपये किमतीच्या दारूच्या २३ बॉटल पकडल्या.

आरपीएफ महिला पथक : काजीपेठ पॅसेंजरमध्ये दारू पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी रेल्वेस्थानकावररेल्वे सुरक्षा दलाच्या महिला पथकाने काजीपेठ पॅसेंजरच्या जनरल कोचमध्ये ६६५५ रुपये किमतीच्या दारूच्या २३ बॉटल पकडल्या.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील महिला उपनिरीक्षक किरण पाठक, के. एल. देवराज, नुतन कुमारी, कविता कोपाले बुधवारी रात्री ९.१० वाजता गस्त घालत होत्या. प्लॅटफार्म क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या ५७१३५ अजनी-काजीपेठ पॅसेंजरच्या समोरील जनरल कोचमध्ये त्यांना एक बेवारस बॅग आढळली. बॅग बाबत कोचमधील आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ६६५५ रुपये किमतीच्या २३ बॉटल आढळल्या. उपनिरीक्षक किरण पाठक यांनी जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केली.