बुटीबाेरी येथे पाेलिसांचा रुट मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:34+5:302021-04-17T04:08:34+5:30

बुटीबाेरी : काेराेना संक्रमण काळात नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची काटेकाेर अंमलबजावणी करावी, यासाठी जनजागृतीपर एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी बुटीबाेरी शहरात शुक्रवारी ...

Route March of the Paelis at Butibari | बुटीबाेरी येथे पाेलिसांचा रुट मार्च

बुटीबाेरी येथे पाेलिसांचा रुट मार्च

बुटीबाेरी : काेराेना संक्रमण काळात नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची काटेकाेर अंमलबजावणी करावी, यासाठी जनजागृतीपर एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी बुटीबाेरी शहरात शुक्रवारी (दि. १७) रुट मार्च केला.

यावेळी पाेलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची पायमल्ली करू नका, विनाकारण घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा वापर करा, बाजारात व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, खरेदी करताना दुकानासमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, राेडवर विनाकारण फिरू नका, कुठेही अकारण स्पर्श करून नका, हात वारंवार साबणाने धुवा, व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, नंतर ती बंद करावी, यासह अन्य उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन केले. या उपाययाेजनांची पायमल्ली केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पाेलीस प्रशासनाने दिला. स्थानिक पाेलीस ठाण्याच्या आवारातून या रुट मार्चला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध मार्गाने भ्रमण व जनजागृती करीत हा रुट मार्च परत पाेलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाला. ठाणेदार विनाेद ठाकरे यांच्या नेतृत्वातील या रुट मार्चमध्ये एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्यातील सर्व पाेलीस अधिकारी, कर्मचारी व हाेमगार्ड सहभागी झाले हाेते.

Web Title: Route March of the Paelis at Butibari