शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्याचे ७ लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST

नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ७ लाख १ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार ...

नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ७ लाख १ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तिरुमला डेव्हलपरला दिला. व्याज १९ मे २०११ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली. ही रक्कम तिरुमला डेव्हलपरनेच द्यायची आहे.

विलास कन्नमवार असे ग्राहकाचे नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तिरुमला डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच, निर्णयाचे उल्लंघन केल्यास पुढील प्रत्येक दिवसाकरिता २५ रुपये अतिरिक्त नुकसान भरपाई लागू होईल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तिरुमला डेव्हलपरच्या भागीदारांमध्ये महेंद्र गवई, विजय शेळके, शैलेंद्र जयस्वाल व सुरेश डोईफोडे यांचा समावेश आहे.

तक्रारीतील माहितीनुसार, कन्नमवार यांनी तिरुमला डेव्हलपरच्या मौजा शिरुर, ता. हिंगणा येथील ले-आऊटमधील एक भूखंड ११ लाख ६६ हजार ८७४ रुपयांत खरेदी करण्यासाठी जानेवारी-२०११ मध्ये करार केला. त्यानंतर डेव्हलपरला १९ मे २०११ पर्यंत वेळोवेळी एकूण ७ लाख १ हजार रुपये दिले. तसेच, भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍याची मागणी केली. परंतु, त्यांच्या मागणीला प्रतिसाद देण्यात आला नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. डेव्हलपरने आयोगाची नोटीस तामील होऊनही स्वत:ची बाजू मांडण्यासाठी हजेरी लावली नाही. करिता, तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला.