शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गजराज प्रकल्पाची जमीन शेतकऱ्यांना परत करा

By admin | Updated: November 16, 2015 03:13 IST

गजराज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर २१ वर्षांपासून कोणतेही निर्माण कार्य करण्यात न आल्यामुळे..

जमिनीवर कोणतेही निर्माणकार्य नाहीनागपूर : गजराज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर २१ वर्षांपासून कोणतेही निर्माण कार्य करण्यात न आल्यामुळे ही जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी गजराज प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चौधरी यांनी केली आहे. शिवणगाव येथील १२० शेतकऱ्यांची ३६३ एकर शेतजमीन १९९३ मध्ये संरक्षण विभागाने वायूसेनेच्या गजराज प्रकल्पासाठी एक लाख पाच हजार रुपये प्रति एकर भावाने संपादन केली आहे. जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतेही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. या संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त केली असता त्यांना वायुसेनेच्या अलाहाबाद येथील मध्य वायू कमांड मुख्यालयाकडून असे सांगण्यात आले की, संपूर्ण जमीन २ सप्टेंबर १९९७ रोजी ताब्यात घेतली. गजराज प्रकल्प रद्द झालेला नसून त्याबाबत विविध टप्प्यात विकास कार्ये सुरू आहेत. प्रत्यक्षात येथील जागेवर अद्याप कोणतेही निर्माण कार्य सुरू करण्यात आले नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांजवळ जमीन नाही आणि रोजगारही नाही. त्यांची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. कायद्यानुसार ही जमीन परत करण्यात यावी, अशी मागणी चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)