शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

युग चांडक अपहरण-खून खटल्याचा निकाल आज

By admin | Updated: January 30, 2016 03:09 IST

बहुचर्चित युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय उद्या शनिवारी जाहीर करणार आहे.

नागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय उद्या शनिवारी जाहीर करणार आहे. राजेश धनालाल दवारे (२०) रा. वांजरी ले-आऊट कळमना, अरविंद अभिलाष सिंग (२४) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा सेंटर पॉर्इंट शाळेत चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे या आरोपींनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटी समोरून अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी आधी १० कोटी आणि नंतर ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. अपहरणकर्त्यांनी युगचा दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात निर्घृणपणे खून केला होता. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजी खुद्द दोन्ही आरोपींनी आपल्या कृत्याची कबुली देऊन नाल्यातील रेतीमध्ये पुरलेला युगचा मृतदेह दखवला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या बहुचर्चित खटल्याच्या सुनावणीस १९ जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. सरकार पक्षाने एकूण ५० आणि बचाव पक्षाने ७ साक्षीदार तपासलेले आहेत. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा, त्यांचे सहकारी अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, आरोपी राजेश दवारे याच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. राजेश्री वासनिक, आरोपी अरविंद सिंग याच्यावतीने अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)