शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन सेवा महाविद्यालयात शहिदांना आदरांजली

By admin | Updated: April 16, 2016 02:36 IST

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अग्निशमन सेवा दिवसानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात सहायक संचालक डी.के.शहा यांनी शहीद स्मारकावर ....

अग्निशमन सेवा दिवस : आग नियंत्रणाचे सादरीकरणनागपूर : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अग्निशमन सेवा दिवसानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात सहायक संचालक डी.के.शहा यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अग्निशमन विभागातील शहिदांना अभिवादन केले.१९५६ साली स्थापना करण्यात आलेले नागपूर येथील अग्निशमन सेवा महाविद्यालय एकमेव आहे. अग्निशमन विभागातील जवानांना येथे आग नियंत्रणाचे प्रशिक्षण देण्यात येते. शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे अग्निशमन विभागाची जबाबदारी वाढली आहे. याचा विचार करता अग्निशमन सेवा क्षेत्राचा विस्तार व विकास केला जात आहे. विविध शाळांतील विद्यार्थ्यांना आग नियंत्रणाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न या महाविद्यायाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती शहा यांनी दिली. महाविद्यालयात दरवर्षी १४ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा आठवडा साजरा केला जात आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध प्रकारच्या वाहनांना लागलेली आग, पेट्रोलियम पदार्थाचा टँकर, बहुमजली इमारत तसेच विमान अपघातानंतर लागलेली आग कशी आटोक्यात आणावी याबाबतचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच अग्निशमन सेवा आठवड्यादरम्यान नागरिकांत आग नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. नागपूर शहरातील ४० विद्यालयातील विद्यार्थ्यांना आगीपासून बचाव करण्याबाबतची माहिती दिली जाणार आहे. यावेळी आर.सी.मनिहार यांच्या नेतृत्वात स्मृती पथसंचलन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून प्रा. डी.के. बोपर्डीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)