शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचडी’ शुल्कवाढीला विरोध

By admin | Updated: February 15, 2016 02:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’ची शुल्कवाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

नागपूर विद्यापीठ : शुल्कवाढ मागे घेण्याची मागणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’ची शुल्कवाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित शुल्कवाढ ही अनावश्यक असून याला तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर विद्यार्थ्यांची ‘कॅम्पस’मध्ये बैठक झाली व प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.‘पीएचडी’च्या विविध शुल्कांमध्ये विद्यापीठाने प्रचंड वाढ केली आहे. अगदी ‘पीएचडी’च्या नोंदणी शुल्कात चक्क थोडीथोडकी नव्हे तर १८५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आतापर्यंत ‘पीएचडी’च्या नोंदणीसाठी ‘सिनॉप्सिस’ सादर करताना ३५० रुपये शुल्क भरावे लागायचे. आता १८५ टक्के अधिक म्हणजे चक्क १००० रुपये शुल्क भरणे अनिवार्य राहणार आहे. नोंदणी शुल्कात ६५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.याशिवाय ‘पीएचडी’साठी नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दर सहा महिन्यांनी ‘रिटेंशन’ शुल्क भरावे लागते. हे शुल्क २२५ रुपये इतके होते. परंतु आता हे शुल्क ५०० रुपये इतके करण्यात आले आहे. यात ११० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. संशोधन प्रबंध सादर करताना संशोधकांना अडीच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागायचे. आता ते शुल्क आठ हजार रुपये झाले आहे. या शुल्कवाढीविरोधात ‘कॅम्पस’मध्ये सुमारे १०० विद्यार्थ्यांनी बैठक घेतली. या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडणार आहे. ही शुल्कवाढ करण्याअगोदर संशोधक व विद्यार्थ्यांचे मत विचारात घ्यायला हवे होते, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली व असे झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला.(प्रतिनिधी)विषयनिहाय शुल्काचे अजूनही परिपत्रक नाहीचदरम्यान, नागपूर विद्यापीठाने परीक्षांसाठी विषयनिहाय शुल्क घेण्याचा निर्णय घेतला असताना त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात कुलगुरूंनी आदेश देऊन परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. विद्यापीठाकडून जाणूनबुजून ‘लेटलतिफी’ करण्यात येत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.