शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा प्रभावित; मेयो, मेडिकलमधील २५ टक्के शस्त्रक्रिया प्रभावित

By सुमेध वाघमार | Updated: August 13, 2024 17:54 IST

Nagpur : ‘आरजी कार’ मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा घटनेची केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष तपास करण्याचा मुख्य मागणीसाठी निवासी डॉक्टरांचा देशभरात संप

सुमेध वाघमारे नागपूर : शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टर मंगळवारी सकाळपासून संपावर गेल्याने मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. संपातून आपत्कालीन रुग्णसेवा वगळण्यात आली असली तरी ओपीडी, वॉर्ड, नियोजित शस्त्रक्रिया, विविध तपासण्यांची कामे खोळंबली. उपचारात उशीर होत असल्याचा रुग्णांच्या तक्रारी होत्या.    

कोलकात्याचा ‘आरजी कार’ मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा घटनेची केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्याचा मुख्य मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘सेंट्रल मार्ड’ने मंगळवारपासून देशभरात संप पुकारला. यात मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टरही सहभागी झाले होते. संपाचा रुग्णसेवेला फटका बसू नये म्हणून दोन्ही रुग्णालयांनी वरीष्ठ निवासी डॉक्टरांसह, वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी डॉक्टरांवर विशेष जबाबदारी टाकली होती. असे असतानाही रुग्णांची हिस्ट्री घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यापासून ते डिस्चार्ज देण्याचे काम निवासी डॉक्टर करीत असल्याने मंगळवारी ते प्रभावित झाल्याचे दिसून आले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मोजकेच डॉक्टर काम करीत होते. त्यामुळे उपचारात उशीर होण्याचे प्रमाण वाढले होते. काही विभागाच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान सकाळी ‘ओपीडी’समोर निवासी डॉक्टरांनी एकत्र येऊन नारेनिदर्शने केली. 

८२२ निवासी डॉक्टर संपावरमेडिकलमध्ये ६७२ तर मेयोमध्ये ३५० असे एकूण जवळपास १,०२२ निवासी डॉक्टर आहेत. त्यापैकी ८२२ डॉक्टर संपावर आहेत. २०० डॉक्टर आप्तकालीन सेवा देत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर