नागपुरात अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती ; हत्येचा सूड,  आरोपीला ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 07:31 PM2021-07-24T19:31:33+5:302021-07-24T19:33:36+5:30

Akku Yadav case repeated, crime news एका सरळसाध्या तरुणाची भोसकून हत्या करणाऱ्या गुंडाचा रात्रभर शोध घेत असलेल्या संतप्त जमावाने शनिवारी सकाळी तो दिसताच दगडाने ठेचून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

Repeat of Akku Yadav case in Nagpur; Revenge of the murder, crushed the accused | नागपुरात अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती ; हत्येचा सूड,  आरोपीला ठेचले

नागपुरात अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती ; हत्येचा सूड,  आरोपीला ठेचले

googlenewsNext
ठळक मुद्देअजनीत थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एका सरळसाध्या तरुणाची भोसकून हत्या करणाऱ्या गुंडाचा रात्रभर शोध घेत असलेल्या संतप्त जमावाने शनिवारी सकाळी तो दिसताच दगडाने ठेचून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. तो मृत झाल्याचे समजून जमाव निघून गेला. मात्र, काही जणांनी रुग्णालयात नेल्यानंतर तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. शिवम ऊर्फ शक्तिमान शुद्धोदन गुरुदेव (वय १९) असे जखमी आरोपीचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या अक्कू यादव प्रकरणाची आठवण ताजी करणारा हा थरारक प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. स्वत:ला शक्तिमान म्हणवून घेणारा हा कुख्यात गुंड अजनीील काैशल्यानगरात राहतो. अल्पवयीन असताना पासूनच गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवघ्या १९ वर्षाचा शक्तीमान स्वत:ला डॉन म्हणवून घेतो. त्याने आपली एक टोळी बनविली असून या टोळीतील गुन्हेगार, चोऱ्या, घरफोड्या, लुटमार आणि दारू विक्रीसारख्या अवैध धंद्यात गुंतले आहेत. आरोपीच्या घराजवळ, कल्पतरू बाैद्ध विहाराजवळ राहणारा स्वयंदीप ऊर्फ स्वयंम सत्यप्रकाश नगराळे (वय २१) आणि त्याचे काही मित्र आरोपींच्या अवैध दारू विक्रीच्या गुत्त्याला विरोध करीत होते. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता. आपली परिसरात प्रचंड दहशत निर्माण व्हावी आणि कुणीही आपल्याविरुद्ध आवाज उठवू नये, यासाठी आरोपी शक्तीमान वेळोवेळी वादविवाद, मारहाण करायचा. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास स्वयंदीप जेवण करून बाहेर निघाला. आरोपी शक्तीमान, निशांत अरविंद घोडेस्वार (वय २२) आणि त्याचे साथीदार प्रकाश कावरेच्याघरासमोर ऑटोत बसून होते. त्यांनी स्वयंदीपला रोखले. शिवीगाळ करून त्याच्यावर चाकूचे सपासप घाव घालून त्याला ठार मारले. त्यानंतर आरडाओरड करीत पळून गेले. सरळमार्गी स्वयंदीपची आरोपींनी हत्या केल्याने या भागातील लोकभावना तीव्र झाल्या. पोलिसांसोबत संतप्त जमावही रात्रभर आरोपींचा शोध घेत होते. दुसरीकडे आपली दहशत निर्माण करण्यासाठी निर्ढावलेला शक्तीमान घराकडे परत आला. जमावाच्या नजरेस पडताच त्याच्याकडे काहींनी धाव घेतली. त्याला दगड विटांनी ठेचून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. हा प्रकार कळताच अजनीचे पोलीस तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आपापल्या ताफ्यासह काैशल्यानगरात पोहचले. दरम्यान, शक्तीमानला काही जणांनी उचलून मेडिकलमध्ये नेले. तो जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले. त्याची प्रकृती गंभीर आहे.

परिसरात प्रचंड तणाव
स्वयंदीप नगराळेच्या हत्येपासून काैशल्यानगरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून तो आज दिवसभरही तसाच होता. परिसरातील नागरिक स्वयंदीपच्या हत्येमुळे शोक आणि संताप व्यक्त करीत होते. तर, या भागातील गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही संताप व्यक्त करीत होते. आरोपी शक्तिमानला पोलिसांनी लगाम घातला असता तर ही घटना घडलीच नसती, असेही नागरिक बोलत होते. दरम्यान, लोकभावना लक्षात घेता परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाल्यामुळे वरिष्ठांनी काैशल्यानगरात दंगा नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.

Web Title: Repeat of Akku Yadav case in Nagpur; Revenge of the murder, crushed the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.