शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेच्या मार्गातील तीन जागांचा अडथळा दूर

By admin | Updated: August 6, 2015 02:51 IST

मेट्रो रेल्वेच्या मार्गातील शासकीय जागांच्या हस्तांतरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, ...

नागपूर : मेट्रो रेल्वेच्या मार्गातील शासकीय जागांच्या हस्तांतरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, मार्गात येणाऱ्या तीन जागा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मॉरिस कॉलेज वसतिगृहाच्या वार्डनचा बंगला, यशवंत स्टेडियमजवळील मैदान आणि सीआरपीएफच्या जागेचा यामध्ये समावेश आहे.मेट्रो रेल्वे हा नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जात असून, यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मेट्रो रेल्वेचा मार्ग कामठी रोडवरील आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान, तर दुसरीकडे पारडी ते हिंगणा टी-पॉर्इंट असा ३८ कि.मी.चा राहणार आहे. यासाठी ६३ एकर जागेची आवश्यकता आहे. यापूर्वी मिहानची जागा हस्तांतरित करण्यात आली व या भागात कामाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. मिहाननंतर खरा अडथळा हा शहरातील जागांचा आहे. मेट्रोच्या मार्गात अनेक शासकीय कार्यालये, इमारती व खाजगी जागांचा समावेश आहे. मात्र हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि मेट्रोच्या कार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला आहे. विविध स्तरावर बैठका घेऊन जागा हस्तांतरणाचे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या तत्परतेमुळे मेट्रोचा मार्ग आता सुकर होत असून, या मार्गातील तीन जागांचे हस्तांतरण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी दिली. मॉरिस टी-पॉर्इंटजवळील वसतिगृहाच्या वार्डनच्या बंगल्याची २०३५ चौरस मीटर जागा, यशवंत स्टेडियमजवळ असलेल्या मैदानाची १.९८ हेक्टर जागा तसेच सीआरपीएफच्या मालकीची २.७ हेक्टर जागा हस्तांतरित झाल्याचे सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले. सीआरपीएफला हिंगणा तालुक्यातील वायफळ येथील जागा देण्याबाबत ठरविण्यात आले असून, याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मैदानाची जागा मोकळीच असल्याने दुसरी जागा देण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. सोमवारीच शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि पटवर्धन शाळा हस्तांतरित करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली होती. जागा हस्तांतरणाच्या कामातील अडथळा दूर करण्यासाठी वेगाने हालचाली होत असल्याने मेट्रो वेळेतच धावणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)