शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

संच मान्यतेतील घोळ दूर करा

By admin | Updated: April 9, 2016 03:15 IST

राज्यातील खासगी माध्यमिक शाळांची २०१५-१६ ची संच मान्यता चुकीची व अन्यायकारक निकष लावून तयार करण्यात आली आहे.

नागपूर : राज्यातील खासगी माध्यमिक शाळांची २०१५-१६ ची संच मान्यता चुकीची व अन्यायकारक निकष लावून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांसोबत पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक सुद्धा मोठ्या संख्येने अतिरिक्त होणार आहे, अशी भीती व्यक्त करीत काँग्रेस शिक्षक सेलचे विभागीय सरचिटणीस पुरुषोत्तम पंचभाई यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना निवेदन देऊन संच मान्यतेतील घोळ दूर करण्याची मागणी केली. सत्र २०१५-१६ ची संचमान्यता २८ आॅगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ ला सुधारित शासन आदेशाद्वारे करण्याचे शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. या आदेशात इयत्ता पाचवी ते दहावी किंवा इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या संयुक्त शाळांमध्ये पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापकांची पदे ठरविण्यासाठी शाळेतील मंजूर शिक्षक संख्या १६ ते ३० करिता १ पर्यवेक्षक, ३१ ते ४५ करिता १ पर्यवेक्षक व १ उपमुख्याध्यापक, ४६ ते ६० करिता दोन पर्यवेक्षक व १ उपमुख्याध्यापक व ६१ पेक्षा अधिक शिक्षक संख्या मंजूर असताना ३ पर्यवेक्षक व १ उपमुख्याध्यापक असे निकष ठरविण्यात आले आहे. परंतु शिक्षण विभागाकडून वाटप करण्यात आलेल्या संच मान्यतेमध्ये मंजूर शिक्षक संख्या ग्राह्य धरताना पाचवी ते आठवी या वर्गांची मान्य शिक्षक संख्या विचारात घेण्यात आली नाही. पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापकाची वाढीव पदे ठरविण्यासाठी एकूण मंजूर शिक्षक संख्या ग्राह्य धरताना पाचव्या किंवा आठव्या वर्गाचे मान्य शिक्षक ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्ट्यमंडळात बाळा आगलावे, संजय धर्माळी, सतीश दामोदरे,सुनील चौधरी, अब्दुल कौसर, सत्यवान साखरे आदीचा समावेश होता. (प्रतिनिधी)