शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाईचा तिढा कायम

By admin | Updated: July 7, 2014 01:00 IST

तालुक्यात गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शासनाने २२ हजार ६२४ शेतकऱ्यांना पात्र ठरवित १४ कोटी ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली.

अतिवृष्टीमुळे नुकसान : एक हजार शेतक ऱ्यांचे ५१ लाख २१ हजार रुपये बँकेत पडून उमरेड : तालुक्यात गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शासनाने २२ हजार ६२४ शेतकऱ्यांना पात्र ठरवित १४ कोटी ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली. यातील एक हजार शेतक ऱ्यांचे ५१ लाख २१ हजार रुपयांचे धनादेश बँकेत पडून आहे.महसूल व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. त्या अनुषंगाने महसूल विभागाने या पात्र शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईची रक्कम धनादेशाच्या माध्यमातून वितरित केली. परंतु, शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांक व नावातील घोळ चव्हाट्यावर आल्याने संबंधित धनादेश वटण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बँकांनी सदर धनादेश तहसील कार्यालयात परत पाठविले. या संपूर्ण प्रकाराला स्थानिक तलाठी जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक व बँकेचे नाव व्यवस्थित न दिल्याने हा घोळ झाल्याचे महसूल विभागातील अधिकारी सांगतात.काही शेतकऱ्यांचे धनादेश महसूल विभागाने नागपूर येथील विदर्भ कोकण बँक, गांधीबाग येथे पाठविले होते. संबधित शेतकऱ्यांचे या बँकेत खाते नसल्याने ते धनादेश परत पाठविण्यात आले. अशाच प्रकारचा घोळ उमरेड शहरातील इतर बँकेत सुरू आहे. हा तिढा सोडविण्यासाठी ज्या बँकेचा धनादेश तयार करण्यात आला, त्या बँकेत संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे खाते उघडावे, असा तगादा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लावला असल्याचे काहींनी सांगितले. या संदर्भात महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व बँकेचे नाव शाखा लिहिताना तलाठ्यांची गफलत झाल्याचे त्यांनी मान्य केले. संयुक्त खातेदार असल्यास ज्या शेतकऱ्याच्या नावे शेतीचा सातबारा आहे, त्यांच्याच नावे धनादेश देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. परिणामी, सातबारा हा मृत शेतकऱ्याच्या नावे असल्यास (नोंदीअभावी) त्याच्या वारसांना ही रक्कम मिळविण्यासाठी कागदी घोडे नाचवित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यातच धनादेशाचे नवे संकट निर्माण झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)