शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दानात दिलेल्या भावंडाची सुटका

By admin | Updated: January 11, 2016 02:31 IST

जुन्या काळात आश्रमाला, मंदिराला दानात मुले देण्याची प्रथा होती. बाल संरक्षणासंदर्भातील कायद्यामुळे या प्रथेवर अंकुश ठेवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे.

जिल्हा बाल संरक्षण विभागाची कारवाई नागपूर : जुन्या काळात आश्रमाला, मंदिराला दानात मुले देण्याची प्रथा होती. बाल संरक्षणासंदर्भातील कायद्यामुळे या प्रथेवर अंकुश ठेवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. असे असतानाही नागपूरसारख्या शहरात एका आश्रमाला दानात दिलेली भावंडे आढळली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याने या आश्रमात धाड टाकून या भावंडाची सुटका केली आहे. या दोन्ही मुलांना आश्रमात दान दिले असल्याचे आश्रमाकडे शपथपत्र आहे. बाल संरक्षण कायद्यांतर्गत मुलांना दान देणे हा गुन्हा असल्याने ही कारवाई करण्यात आली. नरेंद्रनगर परिसरातील एका आश्रमात दोन मुले अडचणीत असल्याची तक्रार चाईल्ड लाईन संस्थेच्या अमरजा खेडकर यांनी जिल्हा बाल कल्याण समितीकडे केली होती. बाल समितीने यासंदर्भात चौकशीचे आदेश जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना दिले होते. बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, कर्मचारी विनोद शेंडे, सामाजिक सुरक्षा सेलचे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी व चाईल्ड लाईनच्या पथकाने आश्रमात धाड टाकून दोन्ही मुलांना सोडविले. याप्रकरणी करण्यात आलेल्या तपासणीत आश्रमाकडे मुले दान दिले असल्याचे शपथपत्र आढळले. ही दोन्ही मुले छत्तीसगड येथील राजनांदगावची आहे. दोघेही भाऊ-बहीण आहे. मुलगा ६ वर्षाचा आहे, तर मुलगी ७ वर्षाची आहे. सध्या ही दोन्ही मुले श्रद्धानंद आश्रमात आहेत. मंगळवारी दोघांनाही बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)