शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला रेड्डींचा विरोध

By admin | Updated: December 23, 2015 03:37 IST

रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी वर्धा मार्गावरील कालाडोंगरी येथील ५० एकर जागा देण्याची घोषणा .....

कालिदास विद्यापीठाला नागपुरात जागा देऊ नकानागपूर : रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी वर्धा मार्गावरील कालाडोंगरी येथील ५० एकर जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपुरात विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला भाजपचे रामटेकमधील आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत जोरदार विरोध केला. रामटेक किंवा परिसरातच विद्यापीठाला जागा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचे मुख्य केंद्र रामटेकमध्येच राहणार असून संस्कृतच्या विकासासाठी नागपुरात उपकेंद्र करीत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही रेड्डी यांचा विरोध कायम राहिला.रेड्डी यांनी विधानसभेत यासंबंधीची लक्षवेधी सूचना मांडली. रेड्डी म्हणाले, संस्कृत विद्यापीठ स्थापन करताना रामटेक नगरधन रस्त्यावरील मौजा परसोडा येथील ३१.७७ हेक्टर जागा संपादित करण्यासाठी १९७७ मध्येच मान्यता देण्यात आली होती. यापैकी फक्त ३.३२ हेक्टर जागा संपादित करून विद्यापीठाची प्रशासकीय वास्तू उभारण्यात आली. रामटेक व परिसरातच विद्यापीठासाठी ५० ते ६० एकर जागा सहजपणे उपलब्ध असताना नागपुरातील वर्धा मार्गावरील कालाडोंगरी येथे जागा का देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चरण वाघमारे, सुनील केदार यांनीही हा प्रश्न लावून धरला. यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ रामटेक येथेच राहणार आहे. विद्यापीठाचा विस्तार होणारनागपूर : राज्यभर विद्यापीठाची उपकेंद्रे करायची आहेत, असे स्पष्ट केले. मात्र, रेड्डी यांचे समाधान झाले नाही. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावे लागले. केदार यांना उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या १५ वर्षात या विद्यापीठासाठी सरकारने एक नवा पैसा दिला नाही. तावडेंनी तर निधी व जमीन दिली. कवी कालिदास यांचा रामटेकशी असलेला संबंध सर्वांना माहीत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे.मुख्यालयही तेथे आहे. मात्र, या विद्यापीठाचा अकोल्यापेक्षा मोठा कॅम्पस नागपुरात आहे. अशाच प्रकारे संस्कृत विद्यापीठाचा विस्तार करण्याचा सरकारचा मानस व्यक्त करीत त्यासाठी सरकार निधी देईल, असे त्यांनी आश्वस्त केले.(प्रतिनिधी)